Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतात कोरोना विषाणू लसीकरणाची सुरुवात (Covid 19 vaccination in India) आजपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात येणार असून ते टप्प्याटप्प्याने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. तथापि, भारतात अधिकृतपणे लस दिल्यानंतर दारू पिण्याशी संबंधित कोणतीही चेतावणी देण्यात आलेली नाही. असे असले तरी, जगभरातील तज्ञ लोकांनी लस लावण्याच्या आधी आणि नंतर काही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

दारूपासून दूर राहणे महत्वाचे
कोरोना विषाणूची लस घेण्यापूर्वी आणि नंतरही अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागतात जसे की दारूपासून दूर राहणे. अल्कोहोलचा प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो आणि अल्कोहोल संसर्गाविरूद्ध लढण्याची क्षमता कमजोर करते. कोरोना लस रोग प्रतिकारशक्तीवरच काम करते. म्हणूनच, आरोग्य तज्ञ म्हणतात की लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काही दिवसांपर्यंत दारू पिऊ नये.

किती दिवसांपर्यंत काळजी घ्यावी लागेल
लस मिळाल्यानंतर किती दिवस दारू पिऊ नये यावर तज्ञांचे भिन्न-भिन्न मत आहे. गेल्या महिन्यात, रशियाच्या आरोग्य तज्ञांनी सांगितले की लोकांनी स्पुतनिक व्ही लस (Sputnik V Vaccine) घेण्याच्या 2 आठवडे आधी आणि लस घेतल्यानंतर 6 आठवड्यांपर्यंत दारू पिऊ नये, कारण यामुळे विषाणूंविरूद्ध लढण्यास लसीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

तथापि, त्यानंतर लस बनवणारे डॉक्टर अलेक्झांडर गिन्टबर्ग यांनी ट्विट करत तीन दिवस सावधगिरी बाळगणे पुरेसे आहे असे सांगितले होते. त्यांनी असेही ट्विट केले की, ‘एक ग्लास शॅम्पेनमुळे कोणतीही हानी होत नाही, रोगप्रतिकारक यंत्रणेवरही त्याचा काही परिणाम होत नाही.’ दुसरीकडे, यूकेच्या आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की लस लावण्यापूर्वी एक दिवस आणि लावल्यानंतर एक दिवस दारू पिऊ नये.

दारूची किती मात्रा हानिकारक ठरू शकते
काही आरोग्य तज्ञ म्हणतात की जर आपण संतुलित प्रमाणात मद्यपान केले तर आपल्याला कोविड -19 लस लावण्यापूर्वी आणि नंतर याबाबतीत चिंता करण्याची गरज नाही. जर आपण जास्त मद्यपान केले (स्त्रियांसाठी दिवसातून एकापेक्षा जास्त आणि पुरुषांसाठी दोनपेक्षा अधिक ड्रिंक), तर आपण ते कमी केले पाहिजे, मग जरी आपण लसीकरण करत असाल किंवा नसाल याची काळजी घेणे आवश्यकच आहे. तसेच तज्ञांचे म्हणणे आहे की लस घेतल्यानंतर शुगर ड्रिंक्स, प्रोसेस्ड फूड, एनर्जी ड्रिंक्स, फास्ट फूड किंवा अल्कोहोलिक पदार्थांचे सेवन करणे देखील टाळावे.