Vadgaon Sheri Assembly Constituency | पुण्यात महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेबनाव ! वडगाव शेरी मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्यास भाजप कार्यकर्ते काम करणार नाहीत

Devendra Fadnavis | devendra fadnavis reaction on ncp leader ajit pawar demad
File Photo
ADV

वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष जगताप यांच्या मागणीने महायुतीमध्ये खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vadgaon Sheri Assembly Constituency | महायुतीमध्ये (Mahayuti) विधानसभेच्या जागा वाटपावरून भडका उडण्याची शक्यता अधिकच दाट झाली आहे. प्रामुख्याने युतीमधील भाजप आणि शिवसेनेकडून अजित पवार (Ajit Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ‘टार्गेट’ करण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. भाजपच्या वडगाव शेरी मतदार संघाच्या अध्यक्षांनी पक्षाच्या नेत्या आणि निरीक्षक पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पत्र देत वडगाव शेरी मतदार संघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यास त्यांच्या उमेदवाराला भाजपकडून कुठलेही सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly), वडगाव शेरीसह, पिंपरी (Pimpri Assembly), चिंचवड (Chinchwad Assembly) आणि शिरूर मतदार संघांची (Shirur Assembly) जबाबदारी भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर सोपविली आहे. मुंडे यांनी आज वडगाव शेरी येथे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेउन चर्चा केली. यावेळी पक्षाचे वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष अर्जुन जगताप (Arjun Jagtap) यांनी मुंडे यांना लेखी पत्र देउन थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधात जाहीर भूमिका घेतली.(Vadgaon Sheri Assembly Constituency)

मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे (Sunil Tingre) विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचा पराभव केला. परंतू मागील वर्षभरात राजकिय परिस्थिती बदलली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसही भाजप, शिवसेनेसोबत (Shivsena Shinde Group) सत्तेत सहभागी झाली. आगामी निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीने ज्याचा आमदार त्याचा मतदारसंघ असे सूत्र ठरविल्याने वडगाव शेरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे वडगाव शेरीतील भाजपचे कार्यकर्ते बेचैन झाले आहेत. यातूनच नुकतेच मुळीक यांनी आमदार टिंगरे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमांच्या जाहीरात फलकावर युतीच्या नेत्यांना स्थान दिल्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत या बेचैनीला वाट करुन दिली होती. अशातच आज विधानसभा अध्यक्ष अर्जुन जगताप यांनी मुंडे यांना दिलेल्या पत्राच्या माध्यमातून मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत उभा दावा मांडल्याचे स्पष्ट झाले आहे.


जगताप यांनी दिलेल्या पत्रामध्ये वडगाव शेरीतील भाजपच्या नगरसेवकांच्या संख्याबळाचा दाखला तसेच भाजपला मानणार्‍या मतदारांची संख्या दिली आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार टिंगरे यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला आहे. टिंगरे यांनी युतीधर्माचे पालन केले असते तर मोहोळ यांचे मताधिक्य वाढले असते. अशा परिस्थितीत भाजपला अनुकुल मतदार संघ जागा वाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडल्यास भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य होणार नाही. याची दखल घेउन जागा वाटपात हा मतदार संघ भाजपला मागून घ्यावा, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | हडपसर: मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्याने ज्येष्ठाचे अपहरण करुन बेदम मारहाण; 7 जणांवर गुन्हा दाखल

Dhananjay Munde On Sharad Pawar | शरद पवारांच्या टीकेला मंत्री धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ” महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला…”

Total
0
Shares
Related Posts