Vadgaon Sheri Assembly Election 2024 | जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांची पदयात्रा; वडगावशेरी मतदारसंघात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | Mahayuti candidate Sunil Tingre's walk in the presence of Jagdish Mulik; Spontaneous response of citizens in Vadgaonsheri constituency

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्यभर प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. नेत्यांच्या बैठकी, सभा, रॅली, पदयात्रा सुरु आहेत. सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

२० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी कमी कालावधी उरला आहे. वडगावशेरी मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढतीत महायुतीकडून सुनील टिंगरे (Sunil Tingre) तर महाविकास आघाडीकडून बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्यात सामना असणार आहे.

दरम्यान काल (दि.१२) सुनील टिंगरे यांची साईबाबा मंदिर, साई नगरी, सुनीता नगर, धनलक्ष्मी सोसायटी, शिवराज शाळा, हनुमान मंदिर, धनलक्ष्मी सोसायटी, माऊली मंदिर, राजेंद्र नगर, साईनाथनगर याप्रमाणे मतदारसंघात पदयात्रा पार पडली.

यावेळी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी महिलांनी औक्षण करत महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते. या पदयात्रेच्या वेळी माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) उपस्थित होते.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर