ADV

Vadgaon Sheri Pune Crime News | पुणे : विजेच्या धक्क्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, महिन्याभरातील तिसरी घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vadgaon Sheri Pune Crime News | खेळत असताना एका दहा वर्षाच्या शाळकरी मुलाला विजेचा धक्का बसला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. मोहित वेदकुमार चावरा (वय-10 रा. गल्ली नं.9, गणेशनगर, वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित बुधवारी (दि.12) रात्री नऊच्या सुमारास मित्रांसोबत घराजवळ खेळत होता. त्यावेळी अचानक त्याचा हात अर्थिंगच्या वायरला लागला. वायरमध्ये विद्युत प्रवाह उतल्याने मोहितला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो जागेवर कोसळला. त्याच्या मित्रांनी याबाबत मोहितच्या घरच्यांना माहिती दिली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.(Vadgaon Sheri Pune Crime News)

मोहित याचे वडील व्यावसायिक आहेत. तो इयत्ता चौथी मध्ये शिकत होता. चावरा कुटंबीय मूळचे गुजरातचे असून, व्यवसायाच्या निमित्ताने ते पुण्यातील वडगाव शेरी परिसरात काही वर्षापूर्वी स्थायिक झाले. या घटनेमुळे चावरा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

महिनाभरातील तिसरी घटना

मागील काही दिवसांपासून विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. महिन्याभरापूर्वी हडपसर परिसरात साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. आठवड्यापूर्वी बालेवाडी भागात उघड्यावर पडलेल्या वायरमधून विजेचा धक्का बसल्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वडगाव शेरी भागात शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)