Vadgaon Sheri Pune Crime | पुणे : प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची प्रेयसीला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vadgaon Sheri Pune Crime | मारहाण करत असल्याने तरुणीने प्रियकरासोबतचे नाते तोडले. याचा राग आल्याने तरुणाने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.22) वडगाव शेरी येथील वाडेश्वरनगर (Wadeshwar Nagar Vadgaon Sheri) येथे रात्री साडे नऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.(Vadgaon Sheri Pune Crime)

याबाबत 21 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 23) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अजहर शेख (वय-23 रा. चांधारेचाळ, बोराटे वस्ती, चंदननगर) याच्यावर आयपीसी 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध (Love Affair) होते. आरोपी फिर्यादी तरुणीला सतत हाताने मारहाण करत होता. त्यामुळे तरुणीने आरोपी सोबत असलेले प्रेम संबंध तोडले. याचा राग आरोपीच्या मनात होता. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता आरोपीने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. याबाबत पीडीत मुलीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार एस.एस. होले करीत आहेत.

किरकोळ कारणावरुन तरुणाला मारहाण

पुणे : पानटपरी समोर उभा केलेली कार बाजूला घेण्यास सांगून एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लाकडी बांबून मारहाण करुन गंभीर जखमी केले.
हा प्रकार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीतील त्रिमुर्ती चौकातील
(Trimurti Chowk Pune) मळाई पान टपरीसमोर सोमवारी (दि.22) रात्री अकराच्या सुमारास घडला.
याप्रकरणी अक्षय अशोक कांबळे (वय-28 रा. धनकवडी) याने फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी अनिल लक्ष्मण चोरघे (वय-28 रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ) याच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्य़ादी अक्षय याने सिगारेट घेण्यासाठी पान टपरीसमोर कार उभी केली होती. आरोपीने कार पुढे घेण्यास सांगितले.
फिर्यादी कार पुढे घेण्यासाठी गाडीत बसले असता आरोपींनी अक्षयला कारमधून बाहेर ओढून काठीने मारहाण केली.
यामध्ये फिर्यादी यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Keshav Upadhye-Pune BJP | संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही ! भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा रोखठोक इशारा

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | अमोल कोल्हेंनी उडवली आढळरावांची खिल्ली, म्हणाले ”ते रडीचा डाव खेळत आहेत, थ्री इडियट चित्रपटातील…”

Cheating Fraud Case Pune | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांची फसवणूक