Vaginal Infection | मान्सूनमध्ये तब्येत बिघडवून टाकेल व्हजायनल इन्फेक्शन, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मान्सूनच्या काळात व्हजायनल इन्फेक्शनची (Vaginal Infection) समस्या खुप जास्त वाढते. पावसाळ्यात इन्फेक्शन पसरवणारे बॅक्टेरिया वाढतात. कपडे सतत दमट राहतात. हीच स्थिती अंडरगार्मेंट्सची असते. याच कारणामुळे पावसाळ्यात व्हजायनल इन्फेक्शनची (Vaginal Infection) समस्या जास्त दिसून येते. मान्सूनमध्ये या समस्येपासून कसा बचाव करावा ते जाणून घेवूयात…

1. कपडे चांगल्या उन्हात सुकवा –
अंडरगारमेंट कधीही सावलीत दमट वातावरणात वाळवू नका. योग्य हवा असलेल्या ठिकाणी किंवा उन्हात टाका.

2. व्हजायनल हायजीन –
हेल्दी आणि फ्रेश राहिल्याने फंगल आणि बॅक्टेरियाचा धोका कमी होतो. डॉक्टरानुसार या हवामानात दिवसातून किमान दोनदा या भागाची स्वच्छता करा. पार्टनरसोबत शारीरीक संबंध ठेवल्यानंतर सुद्धा या नियमांचे पालन करावे.

3. साबणाचा वापर –
एक्सपर्ट सांगतात, व्हजायनल स्किन खुप सॉप्ट असल्याने येथे साबणाचा जास्त वापर करू नये. साबणाची पीएच लेव्हल जास्त असते. यामुळे खाज, रॅशेजची समस्या होऊ शकते.

4. कॉटन अंडरगार्मेंट्स –
पावसात कॉटनचे अंडरगार्मेंट्ंस घालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हे मॉयश्चर लवकर शोषून घेतात आणि एयर सर्कुलेटेड होते.

5. टाईट कपडे घालू नका –
पावसाळ्यात टाईट फिटिंगचे कपडे घालू नका.

6. पीरियडदरम्यान सावधगिरी बाळगा –
एक्सपर्ट सांगतात मान्सूनमध्ये पीरियड्समध्ये हायजीनची जास्त काळजी घ्यावी. महिलांनी 4-6 तासात सॅनिटरी पॅड बदलावा.

7. खुशबूदार प्रॉडक्ट –
आंघोळ केल्यानंतर जांघेच्या जवळपासच्या भागात सुगंधी प्रॉडक्टचा वापर करत असाल तर तो टाळा. यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल कपाऊंट असू शकतात जे इन्फेक्शनचा धोका ट्रिगर करण्याचे काम करू शकते.

8. स्पायसी फूड –
डॉक्टर या हंगामात तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ टाळण्यास सांगतात. कारण यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. यापासून दूर राहावे.

 

व्हजायनल इन्फेक्शनची लक्षणे

व्हजायनल इंफेक्शनमध्ये प्रायव्हेट पार्टजवळ रॅशेज येतात

सतत खाज सुटते

लाल डाग आणि जांघेच्या जवळ हलकी सूज येऊ शकते.

सेक्शुअल इंटरकोर्स आणि यूरीनेशन दरम्यान जळजळसुद्धा याचे सामान्य लक्षण आहे.

Web Title :- Vaginal Infection | vaginal infection during monsoon know symptoms causes and prevention

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

Promotion to Assistant Public Prosecutors | राज्यातील 210 सहायक सरकारी वकिलांना बढती, पुण्यातील 22 जणांचा समावेश; गृह विभागाने काढला अध्यादेश

Sunny Leone | सली लिओनी, रतन टाटांच्या नावानं मुंबईत फिरतेय गाडी; मुंबई पोलिसांकडून 17 जणांवर FIR