Vaginal Itching मुळे अनकम्फर्टेबल वाटत आहे का?, मग Home Remedies अवलंबा आणि लवकर मिळवा आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vaginal Itching | महिलांच्या योनीमार्गात खाज सुटणे किंवा जळजळ (Itching Or Burning In The Vaginal Portion Of Women) होणे म्हणजे संसर्ग होय. सामान्यतः यीस्ट संसर्गामुळे (Yeast Infection) खाज सुटणे किंवा जळजळ होऊ शकते. हा संसर्ग 25 ते 35 वर्षे वयोगटात सर्वाधिक असू शकतो. योनीमार्गात खाज (Vaginal Itching) येण्याची इतरही अनेक कारणे आहेत. योनीमार्गात कोरडेपणा किंवा खराब रेझर वापरल्याने देखील जळजळ किंवा खाज येऊ शकते. (How To Get Rid Of Vaginal Itching).

 

स्वच्छतेचा अभाव असला तरी महिला किंवा मुलींना या त्रासातून जावे लागते. काहीवेळा एखाद्या रसायनाचा वापर केल्यास या समस्येला सामोरे जावे लागते. कोणत्या घरगुती उपायांच्या मदतीने योनी मार्गाच्या संसर्गाचा सामना केला जाऊ शकतो ते जाणून घेवूयात ( Home Remedies for Vaginal Yeast Infection)…

 

योनीत होणारी खाज टाळण्यासाठी उपाय (Remedies For Vaginal Itching)

1. खोबरेल तेल (Coconut Oil)
योनिमार्गात खाज येण्याच्या समस्येवर खोबरेल तेल वापरल्याने आराम मिळतो. पण तुम्ही निवडत असलेले खोबरेल तेल उत्तम दर्जाचे असावे, याची विशेष काळजी घ्या. अन्यथा आराम मिळण्याऐवजी त्रासाला सामोरे जावे लागेल.

 

2. टी ट्री ऑइल (Tea Tree Oil)
टी ट्री ऑइलमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म (Antibacterial Properties) असतात. ज्यामुळे योनीला खाज सुटण्याच्या समस्येत आराम मिळतो. आंघोळ करताना या तेलाचे काही थेंब बादलीतील पाण्यात मिसळा. अशा प्रकारे आराम मिळत नसेल तर हे तेल कोरफडीच्या जेलमध्ये मिसळून योनीमार्गात लावा. हे मिश्रण सुकल्यावर प्रायव्हेट पार्ट नीट स्वच्छ करा.

 

3. कडुलिंबाची पाने (Neem Leaves)
कडुलिंबाच्या पानांमध्ये या संसर्गावर परिणामकारक गुणधर्म असतात. यामध्ये अँटी फंगल गुणधर्म (Antifungal Properties) देखील आहेत. हवे असल्यास कडुलिंबाची पाने घालून पाणी उकळवा. या पाण्याने आंघोळ करावी. जर तुम्हाला कडुलिंबाच्या पानांनी पूर्ण आंघोळ करायची नसेल तर या पाण्याने फक्त योनीमार्ग धुवा. हे पाणी काही दिवस नियमित वापरा.

4. बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोडा वापरण्याचे दोन मार्ग आहेत. टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि काही वेळ त्या पाण्यात बसा. किंवा कोमट पाण्याने बेकिंग सोड्याची पेस्ट बनवा. ती काही वेळ योनीला लावून ठेवा आणि नंतर हलक्या हातांनी कोमट पाण्याने धुवा (Vaginal Itching).

 

या गोष्टींची काळजी घ्या (Take Care Of These Things)

योनीच्या स्वच्छतेसाठी जुना रेझर (Old Razor) किंवा ब्लेड (Blade) अजिबात वापरू नका.

फक्त सुती कपडे घाला (Wear Only Cotton Clothes).

योनीमार्गाच्या स्वच्छतेसाठी कोणताही कडक साबण (Hard Soap) वापरू नका.

पुरेसे पाणी प्या (Drink Enough Water).

स्वच्छतेकडे लक्ष द्या, विशेषत: पीरियड्सच्या (Periods) काळात.

जिमिंग किंवा स्विमिंग (Gym or Swimming) करत असाल तर चांगली आंघोळ केल्यानंतर कपडे बदला.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vaginal Itching | vaginal itching often feels uncomfortable so adopt these home remedies and get rid of it soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Municipal Corporation (PMC) | उजनी धरणातील पाणी प्रदूषित; पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवले

 

Worlds Largest Temple Virat Ramayan Mandir | मुस्लिम कुटुंबाने सर्वात मोठ्या मंदिराला दान केली 2.5 कोटी रूपयांची जमीन

 

Maharashtra Rains | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट