सनातन म्हणते…. वैभव राऊतसह अटकेत असलेले इतरजण आमचे साधक नाहीत

 मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन
वैभव राऊतसह अटकेत असलेले इतरजण सनातनचे साधकच नसल्याचा दावा सनातन संस्थेकडून करण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत माहिती सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत दिली असून, आमच्याविरोधात ज्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यासाठी कायदेशीर मार्गाचा आधार घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. एवढेच नाहीतर बदनामी केल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा देखील सनातनकडून देण्यात आला आहे.

वैभव राऊतला घेऊन ATS ची टीम पुन्हा नालासोपाऱ्यात

दरम्यान वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी राज्याच्या विविध भागातून अनेकांना अटक देखील करण्यात आली होती. यानंतर त्यांचा  संबंध डॉ नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभुमीवर सनातनकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d65f21f8-a9df-11e8-983a-1f24c6f8346d’]
तपासामध्ये स्पष्टपणे सनातनचं नाव अद्याप समोर आलेलं नसतानाही, सनातनला टार्गेट केलं जात असून खोट्या गोष्टी पसरवल्या जात असतील तर त्या थांबवण्यात याव्यात असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. हा आमच्यावरील अन्याय आहे. सनातनमुळे कधीच जातीय तेढ निर्माण झालेली नाही. आम्ही देशाच्या सुरक्षेत अडथळा आणलेला नाही असंही ते म्हणाले आहेत. तसेच कोणत्याही कागदपत्रात आमचं नाव नसताना देखील आमच्यावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. यासोबतच मराठा आंदोलनात घातपात करण्याचा आरोप साफ खोटा असून आरोप करणाऱ्यांची चौकशी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.