राऊत याला अटक म्हणजे मालेगांव ‘पार्ट २’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र दहशदवादविरोधी पथकाने वैभव राऊत याला केलेली अटक ही ‘मालेगांव २’ चा पार्ट आहे का अशी शंका येते असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केला आहे.

अटक केलेला वैभव राऊत हा हिंदू संघटनांच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत असे. हिंदू गोवंश रक्षा समिती या संघटनेच्या माध्यमातून तो सहभागी होत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता.
[amazon_link asins=’B0711Y97RQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63c5f00e-9c90-11e8-b60d-bde791183a8d’]

हिंदूत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे या सारख्या घटना आता नवीन नाहीत. त्यामुळे राऊतची अटक ही मालेगांव ‘पार्ट २’ आहे का अशी शंका येते