Vaidyanath Co Operative Bank | पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ सहकारी बँकेवर आरबीआयची कारवाई

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – वैद्यनाथ बँकेने ग्राहकांचे केवायसी अद्ययावत न केल्याने रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेला अडीच लाखांचा दंड (Vaidyanath Co Operative Bank) ठोठावला आहे. वैद्यनाथ सहकारी बँक पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असून, खासदार डॉ. प्रितम मुंडे (MP Dr. Pritam Munde) या बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे मुंडे कुंटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे. आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड बँकिंग नियमन कायद्याच्या 1949 चे कलम 46 (4) (i) आणि कलम 56, 47 अ (1) (C) अन्वये वरील निर्देशांचे पालन न केल्यामुळे आकारण्यात आला आहे. ही माहिती आरबीआयचे मुख्य महाप्रबंधक योगेश दयाल (Chief General Manager Yogesh Dayal) यांनी पत्रक जारी करत (Vaidyanath Co Operative Bank) दिली आहे.

 

आरबीआयची सदर कारवाई नियामक बँकेच्या अनुपालनातील अनियमिततेवर आधारीत आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. वैद्यनाथ बँकेने आरबीआयच्या आदेशाचे पालन न केल्याचे देखील आदेशात म्हटले आहे. वैद्यनाथ बँकेने विहित (Vaidyanath Co Operative Bank) कालावधीनुसार आपल्या ग्राहकांचे केवायसी अद्ययावत (KYC Update) केले नाहीत. तसेच खात्यांच्या जोखमीच्या वर्गीकरणाचे वेळोवेळी पुनरावलोकन देखील केले नाही, इत्यादी आरोप वैद्यनाथ बँकेवर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यनाथ बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, बँकेकडून दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान तोंडी बाजू मांडल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) दंडात्मक कारवाईच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच बँकेला अडीच लाखांचा दंड ठोठावला आहे.

वैद्यनाथ सहकारी बँक पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असून, खासदार डॉ. प्रितम मुंडे या बँकेचे संचालक आहेत.
त्यामुळे मुंडे कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जातो. भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि
खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

Web Title :- Vaidyanath Co Operative Bank | pankaja munde rbi action on vaidyanath bank fine imposed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

Sandeep Karanje | सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे

CP Vinay Kumar Chaubey | विनय कुमार चौबे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड आयुक्त पदाचा पदभार