Vaishali Agashe | LIC च्या सातारा विभागीय कार्यालयाच्या खेळाडू वैशाली आगाशेंची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Vaishali Agashe | सातारा येथील एलआयसी ऑफ इंडियाच्या (LIC of India) सातारा विभागीय कार्यालयाच्या खेळाडू वैशाली विनायक आगाशे (Vaishali Agashe) यांची 50 वर्षांवरील वयोगटात महिला एकेरी व महिला दुहेरी विभागात वेल्वा, स्पेन या ठिकाणी होणाऱ्या वर्ल्ड मास्टर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

 

सातारा जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी निवड झालेल्या वैशाली विनायक आगाशे (Vaishali Agashe) एकमेव खेळाडू आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल सातारा बॅडमिंटन जिल्हा संघटनेतर्फे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष व सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराजे भोसले (Shivaji Raje Bhosale, Vice President of Maharashtra Badminton Association and President of Satara District Badminton Association) व महाराष्ट्राचे खेलो इंडियाचे मार्गदर्शक मनोज कान्हेरे (Manoj Kanhere, the guide of Play India of Maharashtra) यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे. मडगाव गोवा (Madgaon Goa) येथे पार पडलेल्या निवड चाचणीतून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी पात्र होण्याची वैशाली विनायक आगाशे (Vaishali Agashe) यांची तिसरी वेळ आहे. या अगोदर त्यांनी 2013 मध्ये टर्की व 2019 मध्ये पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या वर्षीची वर्ल्ड मास्टर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत वेल्वा, स्पेन या ठिकाणी होणार आहे. वैशाली आगाशे गेली 31 वर्षे भारतीय आयुर्विमा महामंडळात खेळाडू म्हणून कार्यरत आहेत.

 

Web Title :- Vaishali Agashe | Vaishali Agashe, a player from LIC’s Satara divisional office, has been selected for the World Badminton Championships

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Slim and Trim | लग्नाच्या वयात आलेल्या मुलींनी हिवाळ्यात ‘हे’ 4 पदार्थ खाणे बंद करावेत, अन्यथा बिघडू शकते फिगर

Omicron Variant | ‘कोरोना’चा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’चा सर्वाधिक धोका कोणाला? समोर आली महत्त्वाची माहिती

Bank Holidays in December | डिसेंबर 2021 मध्ये एकुण 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Pune Crime | पती-पत्नीतील भांडणात रस्त्यावरील वाहनांची केली तोडफोड; पुण्याच्या बोपोडीत जावयाचा ‘धिंगाणा’

Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार ! प्रियकर आणि त्याच्या मित्राकडून ‘डर्टी पिक्चर’ व्हायरल; येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक

Personal Finance | कामाची बातमी ! 1 डिसेंबरपासून होणार आहेत मोठे बदल, तुमच्या खिशावर वाढणार भार; जाणून घ्या