साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची झाली निवड 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला निमंत्रित करण्याचे साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ठरवले असून साहित्य महामंडळाच्या  आणि संमेलन आयोजकांच्या बैठकीत या बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.  वैशाली सुधाकर येडे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निवड झाली आहे.

वैशाली सुधाकर येडे या राजूर येथील रहिवाशी असून त्यांच्या कडे तीन एकर शेती आहे. त्यांचे पती सुधाकर येडे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलीय आहे. संमेलनात होत असलेल्या वादाच्या संघर्षातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची उद्घाटक म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कळंब येथील वैशाली सुधाकर येडे ही महिला साहित्य सम्मेलनाचे उद्घाटन करणार आहे. त्या सध्या संसार चालवण्यासाठी नाटकात काम देखील करत असतात. त्यांना दोन मुले असून त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी वैशाली यांच्यावरच आहे. वैशाली या अंगणवाडी सेविकेची मदतनिस म्हणून काम करतात परंतु त्या पगारावर उदरनिर्वाह होत नाही म्हणून त्या नाटकात देखील काम करतात. श्याम पेठकर यांनी लिहिलेल्या ‘तेरव’ या नाटकात त्या काम करतात. हे नाटक  हरीश इथापे यांनी दिग्दर्शित केले आहे.

साहित्यिक उद्घाटक म्हणून निमंत्रण स्विकारायला तयार नाही म्हणून केली हि निवड 
साहित्य संमलेनात वाद निर्माण झाल्यामुळे आणि वादाला राजकीय वळण लागल्याने आयोजक आणि महामंडळाच्या सदस्यांचे निमंत्रण स्वीकारायला कोणताच साहित्यिक तयार नसल्याने आयोजकांची पाचावर धारण बसली आहे. अशातच ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, कवी विठ्ठल वाघ आणि सुरेश द्वादशीवर या मोठ्या साहित्यिकांनी उद्घाटक म्हणून येण्यास नकार दिल्याने आता मोठ्या नामुष्की नंतर साहित्य महामंडळाने  वैशाली सुधाकर येडे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे.