काय सांगता ! होय, शरद पवारांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं ‘कौतुक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे, आरोप प्रत्यारोपांच्या तोफा आता थंडावणार आहेत. मात्र त्या आधीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजी माजी पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या निर्णयामुळे कोणतीही कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायचे मात्र आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कठोरपणे पावले टाकून अंमलबाजवणी करतात अशा प्रकारचे वक्तव्य शरद पवारांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

कोणाच्याही मनात कटू निर्माण होणार याची काळजी नेहमी वाजपेयी साहेब घ्यायचे. त्यामुळेच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता आणि आजही आहे. पण मोदींच्या कामाची पद्धत वाजपेयींपेक्षा वेगळी आहे, अशा प्रकारे पवारांनी आजी माजी पंतप्रधानांची तुलना केली आहे. तसेच सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीला भाजप जबाबदार असून सध्या शेतकरी अस्वस्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्राबाबत बोलताना पवारांनी सध्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शेतकरी आणि उद्योग जगताचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. फडणवीसांचं नेतृत्त्व फारसं प्रभावी आणि परिणामकारक नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदान दोनच दिवसावर येऊन पोहचले आहे, जनता यावेळी कोणाच्या पारड्यात कौल देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. निवडणुकीनंतर दोनच दिवसांनी म्हणजेच 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या