अटलजींच्या ‘सदैव अटल’ स्मारकाचे आज झाले लोकार्पण 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाचे आज त्यांच्या जयंतीचे अवचित्य साधून लोकार्पण करण्यात आले आहे. त्यांच्या स्मारकाला ‘सदैव अटल’ असे नाव देण्यात आले असून त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न त्यांच्या समाधी स्मारकाचा माध्यमातून केला जाणार आहे. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सबंध देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अटलजींच्या स्मारकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम अत्यंत सध्या पध्द्तीने पार पडला असून या कार्य्रक्रमाला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होती. शांतीवन परिसरात उभारण्यात आलेल्या  अटक बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाला आता ‘सदैव अटल’ असे संबोधण्यात येणार आहे. या स्मारकासाठी १० कोटी ५१ लाख रुपये खर्च करण्यात आले असून अटलजींच्या समाधी स्थळात अटलजींच्या राहण्यातील साधेपणाची छबी जपण्यात आली आहे.  हे स्मारक आज पासून सामान्य जणांसाठी खुले करण्यात आले असून येत्या काळात या ठिकाणी सामान्य लोक मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचा संभव आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच ट्विट करून अटलजींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे कि अटलजींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. तसेच अटलजींच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी वंदन असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अटलजींना दूरदर्शी नेता म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. तर तिकडे विधान भवन परिसरात आपण अटल बिहारींचे तैलचित्र लावणार असल्याची घोषणा आज उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. तर अटलजींच्या स्मृती जपण्यासाठी आपण पटना येथे त्यांचा पुतळा उभारणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केले आहे.