‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी दिल्ली विश्वविद्यालयातील युवक झाडाला बांधतात कंडोम, कारण जाणून व्हाल हैराण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  फेब्रुवारी महिना म्हटलं की तरुणाईसाठी हा महिना विशेष असतो. त्याचं कारण आहे ‘व्हॅलेंटाईन डे’. फेब्रुवारी महिन्याच्या 14 तारखेला हा दिवस साजरा केला जातो. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांना गिफ्ट देत असतात. पण दिल्ली विद्यापीठात एक वेगळाच प्रकार केला जात होता. तिथं तरुण झाडाला कंडोम बांधून हा दिवस साजरा करत होते.

अनेकांचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा वेगवेगळा प्लॅन असतो. पण दिल्ली विद्यापीठातील तरुणांकडून व्हॅलेंटाईन डे झाडाला कंडोम लावून साजरा केला जात होता. या विद्यापीठातील विद्यार्थी व्हर्जिन झाडाची पूजा करत होते. इतकेच नाही तर त्या झाडाला ते कंडोमही बांधत होते. अनेक वर्षांपासूनची ही प्रथा होती. त्यामुळे विद्यार्थीनींकडून याला विरोध केला जात होता. अनेक वर्षांपासून तरुणींकडून विरोध सुरुच होता. पण नंतर बॉलिवूड अभिनेता रणवीरसिंह याला ‘लव्ह गुरु’ म्हणून त्याची पुजा केली होती. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी व्हर्जिन ट्रीच्या पूजेचे आयोजन केले होते. त्यानंतर दरवर्षी ते व्हर्जिन ट्रीवर कंडोम बांधत होते.

खरे प्रेम मिळेल म्हणून…

अशाप्रकारे झाडाला कंडोम बांधल्याने आणि व्हर्जिन झाडाची पूजा केल्याने तरुणांना प्रेमिका (गर्लफ्रेंड) मिळू शकेल, या हेतूने ते अशा प्रकारचे कृत्य करत होते.

सध्या प्रथा बंद

विद्यापीठातील या प्रकरणाची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर याला मोठा विरोध होऊ लागला. अखेर मोठ्या विरोधानंतर ही प्रथा बंद करण्यात आली.