‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल व्हिडीओमुळे अमृता फडणवीस झाल्या ‘ट्रोल’, नेटकऱ्यांनी करून दिली ‘पुलवामा’ची आठवण (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना संगीत आणि गाण्याची किती आवड आहे सर्वाना माहितीच आहे. आज सगळीकडे वॅलेंटाईन डे साजरा केला जात असताना त्यांनी एक इंग्रजी गाणं सादर केलं आहे जे त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर केलं आहे. हेलो असं या व्हिडीओ साँगचं नाव आहे. लिओनेल रिची (Lionel Richie) यांचं मूळ गाणं आहे. हे गाणं शेअर करत अमृता फडणवीसांनी वॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. कही युजर्सनं त्यांना आजच्या दिवशी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली आहे.

अमृता फडणवीस आपल्या या इंग्रजी गाण्यामुळं प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. या गाण्याचं चित्रीकरण अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आलं आहे. व्हिडीओ साँग शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, “Darkness cannot drive out darkness, only Light can do that ! Hate cannot drive out hate, only Love can do that ! Here’s a cover version of my favourite song by Lionel Richie …Just for You ! Enjoy it with LOVE ! Happy Valentine’s Day !” असं म्हणत त्यांनी सर्वांना वॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहे.

अमृता फडणवीसांना या गाण्यासाठी अनेकांनी ट्रोल केलं आहे. सध्या हे व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. काहींनी त्यांच्या आवाजाची खिल्ली उडवली आहे. काहींनी त्यांना पुलवामा दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली आहे. काहींनी अमृता फडणवीसांना पुलवामा दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देत म्हटलं की, आज पुलवामा शहीद दिवस आहे आणि तुला असले चाळे सुचायलेत.

एकानं त्यांच्या आवाजाची खिल्ली उडवत म्हटलं आहे की, मिस्टर राजकुमारपेक्षा चांगला आवाज आहे. एकानं म्हटलं की, गाण्यात सुरवातीलाच कानात कानठळ्या बसल्या पुढे गाणं बंद केलं. मला वाटलं माझे हेडफोन खराब झालंय.


आणखी एकानं असं म्हटलं की, तुमचे म्युझिक व्हिडिओ खूप मनोरंजक असतात. कंमेंट वाचायला तर खूपच मजा येते” काहींनी अनेक खराब-खराब कमेंटही केल्या आहेत.