Valentine Week 2020 : 7 फेब्रुवारीपासून सुरू होतोय ‘वॅलेंटाईन’ वीक, ‘इथं’ पहा यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  जगातील सर्वच कपल वॅलेंटाईन डे साजरा करतात. 14 फेब्रुवारीची तर सर्वजण आतुरतेनं वाट पहात असतात. 7 दिवस आधीच वॅलेंटाईन विकला सुरुवात होत असते. या एका आठवड्यात वेगवेगळा डे साजरा केला जातो. या आठवड्यात लोक आपल्या पार्टनरला गिफ्ट्स, कार्ड्स आणि चॉकले्टस देऊन स्पेशल फील करून देत असतात.

वॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीला सुरू होता. या दिवशी रोज डे असतो. हा वीक 14 फेब्रुवारीपर्यंत असतो. जाणून घेऊयात वॅलेंटाईन वीकमध्ये कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जातो.

7 फेब्रुवारी- रोज डे (Rose Day)

वॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोज डे साजरा केला जातो. या दिवशी कपल एकमेकांना लाल गुलाब देतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात.

8 फेब्रुवारी- प्रपोज डे (Propose Day)

या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना प्रपोज करतात आणि आपलं प्रेम व्यक्त करतात.

9 फेब्रुवारी- चॉकलेट डे (Chocolate Day)

कपल आपल्या पार्टनरला चॉकलेट किंवा कॅटबरी देऊन प्रेमात गोडवा आणतात.

10 फेब्रुवारी- टेडी डे (Teddy Day)

या दिवशी कपल एकमेकांना टेडी भेट देतात. खास करून मुलींना टेडी जास्त आवडतो. त्यामुळे जनरली मुलं मुलींना टेडी भेट देतात.

11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे (Promsie Day)

या दिवशी प्रेमात आकंठ बुडालेले कपल एकमेकांना शेवटपर्यंत अशीच साथ देण्याचं आणि प्रेम करण्याचं वचन देतात. कपलनुसार ही वचनं वेगवेगळीही असतात.

12 फेब्रुवारी- हग डे (Hug Day)

या दिवशी कपल एकमेकांना अलिंगन देतात. एकमेकांच्या असंच कायम जवळ राहूयात असंच जणू त्यांना सुचवायचं असतं.

13 फेब्रुवारी- किस डे (Kiss Day)

वॅलेंटाईन डेच्या एक दिवसआधी किस डे साजरा केला जातो. या दिवशी कपल एकमेकांना किस करतात आपलं एकमेकांवरील अमर्यादित प्रेम व्यक्त करतात.

14 फेब्रुवारी- वॅलेंटाईन डे (Valentine’s Day)

वॅलेंटाईन वीकच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी वॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो. या दिवशी कपल एकमेकांना स्पेशल फील करवत असतात. एकमेकांना सरप्राईज देतात. सर्वांचा प्रयत्न असतो की, या दिवशी पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवण्याचा कपलचा प्रयत्न असतो.