अभिनेता राजकुमार रावनं गर्लफ्रेंड ‘पत्रलेखा’साठी लिहिलेलं ‘प्रेम’पत्र सोशलवर व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या वॅलेंटाईन वीक सुरू आहे. अनेक प्रेमी आपल्या पार्टनरप्रति प्रेम व्यक्त करताना दिसतात. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाहीत. अभिनेता राजकुमार रावनंही आपली प्रेयसी पत्रलेखासाठी खास अंदाजात प्रेमपत्र लिहिलं आहे. सध्या हे पत्र सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. राजकुमार रावनं इंस्टाग्रामवरून हे पत्र शेअर केलं आहे.

पत्रलेखासाठी लिहिलेल्या लव लेटरमध्ये राजकुमार राव म्हणतो, “डिअर पत्रलेखा, हा प्रेमाचा महिना आहे. मी याबद्दलच विचार करत होतो. प्रेमाबद्दल, त्या शब्दांबद्दल आणि इशाऱ्यांबद्दल मी विचार करत होतो ज्याच्या मदतीनं आपण प्रेम व्यक्त करत असतो. एवढे चांगले रोल केल्यानंतरही माझ्यात मनात प्रेमाला कबूल करण्याबद्दल, इशारे करण्याबद्दल, व्यक्त करण्याबद्दल सवाल उपस्थितीत होत असतात. प्रेम ते आहे ज्याच्यातून माणूस जग गोल फिरतो. हा असंच होत असतं. प्रेमाबद्दल खूप काही वाईट साईटही बोललं गेलं आहे. खूप मिसअंडरस्टँडिंग केली गेली आहे. मला त्याच खोटारड्यांची काळजी आहे”

आपल्या दोन पानी लव लेटरमध्ये राजकुमार राव म्हणतो, “प्रेमात आंधळं होणं, बहिरं होण्यासारख्या गोष्टी बोलत असतात कारण त्यांना आपलं प्रेम व्यक्त करायचं असतं. परंतु याचा कधी विचार केला आहे का, याचा काय अर्थ होतो. लॉजिकच्या पलीकडे म्हणजे प्रेम आहे का. हे ते आहे का जे तुम्हाला असह्य करून सोडतं?”

पुढे राजकुमार म्हणातो, “आपण सोबत आहोत अनेक वर्षे झाली आहेत. आपण खूप चढ-उतार पाहिले आहेत. परंतु या सगळ्या दरम्यान एक गोष्ट स्थिर आहे ती म्हणजे आपण. तेदेखील कोणत्याही डिनर डेट्स, चॉकलेट आणि दिखावा करणाऱ्या कोणत्याही गोष्टींची गरज न जाणवता. मला या रस्त्यावर चालत रहायला आवडेल. जे गरजेचं ते करायला मला आवडेल. या सुंदर जाणिवेची कल्पना करत करत पुढे जायला मला आवडेल जेणेकरून आपण मिळून आणखी मजबूत होऊ.”