Valentine Special : अभिनेता करण कुंद्रानं ‘या’ ठिकाणी केला होता अनुषाला पहिला ‘KISS’, आली होती नात्यात दरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता करण कुंद्रानं 2008 साली आलेल्या बालाजी टेलिफिल्म्सचा शो कितनी मोहब्बत मधून अ‍ॅक्टींगमध्ये डेब्यू केला होता. या शोमध्ये कृतिका कामरा त्याच्यासोबत काम करताना दिसली होती. यानंतर करणनं अनेक मालिकेत काम केलं आहे. एका मुलाखततीत करण कुंद्रानं त्याच्या आणि अनुषा दांडेकरच्या लव स्टोरीवर भाष्य केलं आहे. त्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. करणनं सांगितलं आहे की, अनुषाला त्यानं पहिला किस कुठे केला होता म्हणजेच त्यांनी पहिल्यांदा किस केला ते ठिकाण कोणतं होतं हे त्यानं सांगितलं आहे. आय लव यु कोणी म्हटलं होतं याचाही खुलासा त्यानं केला आहे.

एका मुलाखतीत आपल्या स्टोरीवर भाष्य करताना करण कुंद्रा म्हणतो, “अनुषासोबत भांडणं होण्याचं कधीच काही कारण नव्हतं. मी पहिल्यांदा अनुषाला किस दिल्लीत केला होता. पहिल्यांदा I Love You देखील मीच म्हटलं होतं. अनुषालाही हे ऐकून खूप भारी वाटलं होतं.” याशिवाय करणनं इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. या वॅलेंटाईनला त्याचे काही प्लॅन्स असल्याचंही त्यानं मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B8VpBSFBVNb/

काही दिवसांपूर्वीच करण आणि अनुषा या कपलपैकी असं ऐकायला मिळालं होतं की, त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. असे अंदाज लावले जात होते की करणची कोस्टार कृतिका कामरामुळे त्यांच्यात अंतर आलं होतं. यानंतर या कपलनं यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता. आजही हे दोघे सोबतच आहेत.

https://www.instagram.com/p/B8RIN8cB9tF/

https://www.instagram.com/p/B7u_WTwBtWp/

https://www.instagram.com/p/B7QwedQhy49/

https://www.instagram.com/p/B3CfO_Nhcl8/