‘कधी भैय्या तर कधी सैय्या’ ! जेव्हा कलाकारांनी स्क्रीनवर ‘बहिणीं’सोबत केला ‘रोमँस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सगळीकडे वॅलेंटाईन डे साजरा केला जाताना दिसत आहे. वॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आज आपण बॉलिवूडमधील अशा काही स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी काही सिनेमात रोमँस केला आहे तर काही सिनेमात बहिण – भावाची भूमिका साकारली आहे.

1) ओम शांती ओम या सिनेमात दीपिका पादुकोण आणि अर्जुन रामपाल यांचं अफेअर दाखवण्यात आलं होतं. यानंतर हाऊसफुलमध्ये दोघांनी बहिण-भावाची भूमिका साकारली आहे.

2) सलमान खान आणि नीलम कोठारी यांचा हम साथ साथ है हा सिनेमा सर्वांच्यात लक्षात आहे. या सिनेमात दोघांनी बहिण – भावाची भूमिका साकारली होती. दोघांनी बाँडिंग खूपच शानदार होती. परंतु एक लडका एक लडकी या सिनेमात मात्र दोघांनी रोमँस केला.

3) देसी बॉय या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम ऑनस्क्रीन रोमँस करताना दिसले. दोघांची केमिस्ट्री सर्वांना आवडली होती. परंतु रेस 2 या सिनेमात मात्र दोघं भाऊ – बहिण झाले होते.

4) जय हो या सिनेमात सलमान खान आणि डेजी शाह यांनी रोमँस केला होता. तर रेस 3 या सिनेमात ते भाऊ – बहिण बनले होते.

5) रणवीर सिंग आणि प्रियंका चोपडानं बाजीराव मस्तानी आणि गुंडे या सिनेमात जोरदार रोमँस केला होता. दिल धडकने दो या सिनेमात मात्र रणवीर आणि प्रियंका भावा – बहिणीच्या रोलमध्ये होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like