जगभरात ‘असा’ साजरा होतो ‘वॅलेंटाईन डे’, कुठे फोटो जाळतात, कुठे उशीवर तमालपत्र ठेवतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच वॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. वॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का आम्ही फक्त भारताबद्दल बोलत नाही आहोत तर इतर देशांना विचारात घेऊन बोलत आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की, वेगवेगळ्या देशांमध्ये वॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो.

1) फिलीपींस – या ठिकाणी हजारो कपल्स एकत्र येतात आणि एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन विवाहबद्ध होतात.

2) फ्रान्स – रोमँटीक ठिकाणांपैकी एक असलेल्या फ्रान्समध्ये काही वेगळ्याच अंदाजात वॅलेंटाईन डे साजरा केला जातो. जर एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडत नसेल आणि इतर मुलींना पसंत करत असेल तर ती मुलगी आवडत नसलेल्या मुलाचा फोटो जाळून वॅलेंटाईन डे साजरा करते. अगदी बॉनफायर करून मुलाचा फोटो जाळण्याचा कार्यक्रम केला जातो.

3) ब्राझील – वॅलेंटाईन डे साजरा करताना ब्राझीलमध्ये चॉकलेट्स आणि कार्ड्सच्या भेटवस्तू देऊन साजरा केला जातो. परंतु कदाचित तुम्हाला खोटं वाटेल की, या ठिाकणी 12 जून रोजी वॅलेंटाईन डे साजरा केला जातो. येथील लोक सेंट अँथोनी डे च्या स्वरूपात हा दिवस साजरा करतात.

4) इंग्लंड – येथील महिला उशीवर तमालपत्र ठेवून वॅलेंटाईन डे साजरा करतात.

5) वेल्स – या ठिकाणी कपल्स एकमेकांना लाकडाचे चमचे भेट म्हणून देतात. या चमच्यांना लव स्पून्स म्हणतात. 25 जानेवारी रोजी या ठिकाणी वॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

6) इटली – इथं काही वेगळ्याच अंदाजात हा दिवस साजरा केला जातो. यावेळी तरुण गार्डनमध्ये एकत्र येतात. म्युझिकही सुरू असतं. हा डे स्प्रिंग फेस्टीवलच्या स्वरूपात साजरा केला जातो. लग्न न झालेल्या मुली सकाळी लवकर उठतात. त्यांना जो पुरुष सर्वात आधी पहातो तोच त्या मुलीचा पती होण्याची जास्त शक्यता असते.

7) डेन्मार्क – या ठिकाणी पुरुष महिलांना कार्ड देत असतात. तब्बल 1990 पासून इथं वॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

8) जपान – या दिवशी एकामेकांना थँक्स म्हणून हा डे साजरा केला जातो. इतकेच नाही तर आपल्या कुटुंबीयांनाही धन्यवाद देण्यासाठी चॉकलेट्स दिले जातात.