Valentine’s Day | प्रेमासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी केली हद्द पार; कोणाकोणाचा आहे समावेश

पोलीसनामा ऑनलाईन : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना आहे. याच महिन्यात व्हॅलेंटाईन (Valentine’s Day) वीक साजरा केला जातो. आणि या आठवड्यामधला आजचा दिवस एकदम खास आहे कारण आज प्रेमाचा दिवस.. अर्थात व्हॅलेन्टाईन डे.. आहे. या दिवसाची सगळेचजण आतुरतेने वाट पाहत असतात. जर तुम्हालाही तुमच्या भावना तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करायच्या असतील तर आजचा यासाठी दिवस अगदी योग्य आहे. यासाठी तुम्ही बॉलिवूडमधील स्टार्सची मदत घेऊ शकता. बॉलिवूड कलाकारांनी खूपच वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांच्या प्रियकर/प्रेयसीला आपल्या भावना सांगितल्या आहेत. काहींनी आपल्या अंगावर टॅटू गोंदवले तर काहींनी गुढग्यावर बसून प्रपोज केला. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी प्रेम मिळवण्यासाठी सगळ्या हद्द पार केल्या आहेत. (Valentine’s Day)

करीना कपूर आणि शाहिद कपूर जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. करीना शाहिदच्या प्रेमात इतकी वेडी होती की तिने त्याच्यासाठी मांसाहार कायमचा सोडून दिला. खरं तर, शाहिद शाकाहारी होता आणि त्यामुळे करीनानेही मांसाहार केला नाही. दोघांच्या ब्रेकअपने त्यांच्या चाहत्यांची मनं तुटली होती. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकाहाणी तर सगळ्यांनाच माहित आहे. हे प्रेमी युगूल प्रेमात एवढे वेडे झाले होते की त्यांनी त्या काळात अशक्य वाटतील अशा गोष्टी केल्या होत्या. धर्मेंद्र यांनी त्यांच्या ‘ड्रीम गर्ल’साठी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले होते.त्यांनी लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. कारण हेमामालिनीसोबत हे त्यांचं दुसरं लग्न आहे. दोघांनी 1980 मध्ये लग्न केले होते. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही म्हणून त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. (Valentine’s Day)

मिस्टर परफेक्शन्सिट म्हणून ओळखला जाणारा आमिर खानने त्याच्या पहिल्या पत्नी रीनाला रक्ताने प्रेमपत्र लिहिलं होत.18 एप्रिल 1986 रोजी अमीर खानने रीना दत्तासोबत पळून जाऊन गुपचूप लग्न केले होते. पण लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला.अन नंतर त्याने किरण राव सोबत लग्न केलं. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनविषयी देखील सगळ्यांना ठावूक आहे. दीपिकाने स्वतःच्या मानेवर, आर के, नावाचा टॅटू करून घेतला. हा टॅटू म्हणजे दीपिकाने रणबीर कपूर विषयी व्यक्त केलेले प्रेम. पण त्यानंतर दीपिका पदुकोण हिने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत 2018 मध्ये लग्न केले.

Web Title :- Valentine’s Day | valentines day special celebrities wrote love letter from blood to tattoo on all over body

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना