Valentine’s Week 2022 | लवकरच येतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’ ! जाणून घ्या Rose Day पासून Valentine’s Day पर्यंतची पूर्ण लिस्ट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लवकरच ‘व्हॅलेटाईन्स डे (Valentine’s Week 2022)’ जवळ आला आहे. अनेक लव्ह कपल्स (Love Couple) या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. ‘व्हॅलेंटाईन वीक’ 7 फेब्रुवारीपासून चालू होत आहे. या सात दिवसांमध्ये प्रियकर (Lover) आपल्या पार्टनरला (Partner) गुलाब (Rose), चॉंकलेट (Choklet), टेडी (Teddy), भेट वस्तू (Gift) आणि अनेक सरप्राईज देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. प्रियकरांसाठी हा वीक म्हणजे एक प्रकारचा उत्सव असतो. व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. त्या विषयी कपल आपलं प्रेम व्यक्त करतात. युरोपमध्ये फेब्रुवारी महिना तसा रोमान्सचा मानला जातो. तर जाणून घेऊया व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week 2022) मधील डे कोणते आहे.

 

व्हॅलेंटाईन वीक लिस्ट (Valentine’s Week List)

7 फेब्रुवारी – रोज डे (Rose Day)

8 फेब्रुवारी – प्रपोज डे (Propose Day)

9 फेब्रुवारी – चॉकलेट डे (Chocolate Day)

10 फेब्रुवारी – टेडी डे (Teddy Day)

11 फेब्रुवारी – प्रोमिस डे (Promise Day)

12 फेब्रुवारी – हग डे (Hug Day )

13 फेब्रुवारी – किस डे (Kiss Day)

14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)

 

7 फेब्रुवारी – रोज डे (Rose Day) :

हा व्हॅलेंटाईन वीक मधील पहिला दिवस आहे. या दिवशी पार्टनर आपल्या लव्हरला गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो. तसेच एकमेकांना लाल रंगाचा गुलाब देतात. लाल गुलाब प्रेमाचं प्रतिक मानलं जात. (Valentine’s Week 2022)

 

8 फेब्रुवारी – प्रपोज डे (Propose Day) :

हा व्हॅलेंटाईन वीक मधील दूसरा दिवस आहे. आपल्याला जी व्यक्ती आवडते, तिला प्रपोज करून आपलं प्रेम व्यक्त करत असतो. कपल्सला हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. याच दिवशी एकमेकांबद्दलच्या भावना कळतात.

 

9 फेब्रुवारी – चॉकलेट डे (Chocolate Day) :

या दिवशी आपल्या पार्टनरला चॉकलेट दिलं जात. तसेच या दिवसासाठी बाजारात वेगवेगळे सजवलेले चॉकलेट्स उपलब्ध असतात.

 

10 फेब्रुवारी – टेडी डे (Teddy Day) :

व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच, बाजारात अनेक विविध प्रकारचे टेडी बघायला मिळतात. मुलींना टेडी प्रचंड प्रमाणात आवडतं. या दिवशी पार्टनरला क्यूट टेडी गिफ्ट केलं जात.

 

11 फेब्रुवारी – प्रोमिस डे (Promise Day) :

प्रोमिस डे हा कपलसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो. या दिवशी कपल एकमेकांना वचन देऊन आपलं जीवन सोबत व्यतित करण्याच ठरवतात. या दिवसामुळं दोघांच्या मधील नातं घट्ट होतं.

 

12 फेब्रुवारी – हग डे (Hug Day) :

प्रेमात स्पर्श अगदी महत्वाचा असतो. स्पर्शामधून प्रेम व्यक्त होत. या दिवशी आपल्या पार्टनरला मिठी मारून आपल्या मनाची स्थिती सांगू शकतो.

 

13 फेब्रुवारी – किस डे (Kiss Day) :

प्रेमात किस अत्यंत महत्वाची असते. किसद्वारे आपण आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. किसला प्रेम व्यक्त करण्याच उत्तम साधन मानलं जातं. या दिवशी आपण आपल्या पार्टनरला कपाळावर, हातावर किंवा ओठांवर किस करून आपलं प्रेम दाखवू शकतात.

 

14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) :

हा दिवस कपलसाठी अत्यंत खास मानला जातो. आपण आपल्या जोडीदाराला सरप्राईज देऊन,
त्याच्या सोबत पूर्ण वेळ घालून हा खास दिवस व्यतित करू शकतो. तसेच या दिवशी आपल्या जोडीदारासोबत डिनर डेटला सुद्धा जावू शकतो.

 

Web Title :- Valentine’s Week 2022 | valentine day week 2022 full list of days and dates rose day propose day chocolate day teddy day promise day hug day kiss day valentine’s day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा