‘वामिका’ पासून ‘तैमूर’ पर्यंत ! जाणून घ्या ‘या’ 8 बॉलिवूड सेलेब्सच्या मुलांच्या नावाचा अर्थ

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच आईबाबा झाले आहेत. अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सर्वांना विरुष्काच्या मुलीच्या नावाबद्दल उत्सुकता होती. सोमवारी (दि 1 फेब्रुवारी 2021 रोजी) अनुष्कानं मुलीचा पहिला फोटो शेअर करत तिचं नाव जाहीर केलं आहे. तिनं मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे. अनेकांना या नावाचा अर्थ काय आहे अशी उत्सुकता लागली आहे. आज आपण वामिका पासून तर तैमूर पर्यंत 8 बॉलिवूड सेलेब्सच्या मुलांच्या नावाचा अर्थ जाणून घेणार आहोत.

1) वामिका – अनुष्का आणि विराटच्या मुलीचं नाव खूप खास आहे. यात विराटचा व आणि अनुष्काचं का हे अक्षर समाविष्ट आहे. वामिकाचा अर्थ आहे दुर्गा देवी. दुर्गा देवीला वापरलं जाणारं हे एक विशेषण आहे.

2) अबराम – शाहरुख खानच्या लहान मुलाचं नाव अबराम आहे. पैगंबर अब्राहम यांच्या नावावरून अबराम हे नाव इंस्पायर आहे. शाहरुखचं म्हणणं आहे की, यात भगवान रामाचंही नाव समाविष्ट आहे, म्हणून त्याला हे नाव चांगलं वाटलं.

3) रायन आणि एरिन – माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांच्या दोन मुलांची ही नावं आहेत. रायनचा अर्थ आहे स्वर्ग प्राप्तीचा मार्ग आणि लहान मुलगा एरिनच्या नावाचा अर्थ आहे शक्तीचा पर्वत.

4) आराध्या – अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्याचं नाव आहे पूजेसाठी योग्य. जो पूजनीय आहे त्याला संस्कृतमध्ये आराध्या म्हणतात.

5) आरव आणि नितारा – अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या मुलाचं नाव आरव आणि मुलीचं नाव नितारा आहे. आरव म्हणजे शांतीप्रिय असणं आहे. नितारा चा अर्थ आहे मुळांशी खोलवर जोडलं जाणं.

6) इमारा – इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांच्या मुलीचं नाव इमारा आहे. याचा अर्थ आहे मजबूत आणि धाडसी.

7) वियान – अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मुलाचं नाव वियान आहे. याचा अर्थ आयुष्य आणि एनर्जी होतो.

8) तैमूर – सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लाडक्या मुलाचं नाव तैमूर आहे. याच्या नावावरून खूप गोंधळ झाला होता. अरबीत याचा अर्थ लोखंड आणि स्टील असा होतो.