काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा असा सल्ला दिला आहे. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचा वाद सुरु असल्याने भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे सेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन सरकार स्थापन करावे असा सल्ला आंबेडकर यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेून राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर चर्चा केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी हा सल्ला दिला. काँग्रेसने पुढाकार घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करावा. बहुमताचा प्रश्न आता महत्त्वाचा नाही. सभागृह चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. तसे झाले नाही तर सरकार कोसळेल. त्यामुळे नव्या सरकारसोबत जायचे की नव्याने निवडणुका घ्यायच्या हे सदस्यांनाच ठरवायचं आहे, असे ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आंबेडकर यांनी राज्यपालांना पर्याय सुचवले आहेत. ज्या दिवशी शपथविधी होतो तो दिवस विधिमंडळाचा पहिला दिवस मानला जातो. त्यामुळे आम्ही राज्यपालांशी चर्चा केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आधीच्या आमदारांच्या शेवटच्या दिवशीच नव्या आमदारांचा शपथविधी झाला, तरच विधिमंडळ सुरू राहिल. अन्यथा राष्ट्रपती शासन लागू करावं लागणार आहे. असं होऊ नये म्हणून राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आंबेडकरांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके