लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी कोण, गोपीचंद पडळकरांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेआधीच महाराष्ट्रातील राजकारण वंचित बहुजन आघाडीतील फूटीमुळे चांगलेत तापले आहे. वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्षेप घेतला असून प्रकाश आंबेडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशीच मागणी केली आहे. परंतू यावर मात्र गोपीचंद पडळकर यांनी बोलताना जहरी टीका केली आहे. लक्ष्मण माने यांचा बोलवता धनी वेगळाच असून असून त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहे असा आरोप त्यांनी केला. वंचितचे नेते महासचिव गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेनंतर आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

माझा भाजपशी, आरएसएसची संबंध होता –
माने यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप केल्यानंतर त्याला उत्तर देताना पडळकर म्हणाले की, मी भाजपमध्ये होतो हे जगजाहीर आहे. आरएसएसशी माझे संबंध होते. भिडे गुरुजींशी माझे संबंध होते आणि या सर्वांची उत्तर मी याआधीच दिली आहेत. पक्षात प्रवेश करताना मी सर्व खुलासा करुन आलोय. महासचिव पदावर माझी निवड होईल याची मला कल्पना देखील नव्हती. बैठकीत लक्ष्मण माने यांनीच माझे नाव सुचवले. मी त्यांना संगितले नव्हते की माझे नाव पुढे करा. त्यामुळे माने यांना काही आक्षेप असतील तर त्यांनी ते अध्यक्षाकडे मांडावेत.

…म्हणून लक्ष्मण माने नाराज –
यावेळी पडळकर यांनी मानेंवर देखील आरोप केले आहे. लोकसभा निवडणूका झाल्यानंतर वंचितच्या चार बैठका झाल्या. या बैठकीत लक्ष्मण माने यांनी आक्षेप घेतला नाही मग आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माने आक्षेप का घेत आहेत असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला. प्रदेशाध्यक्ष पद मिळत नसल्याने माने नाराज आहेत. लक्ष्मण माने यांचा राष्ट्रवादीशी संबंध आहेत. ते त्यांची भाषा बोलत आहेत. मानेचा बोलविता धनी वेगळाच आहे असा खळबळजनक आरोप पडळकर यांनी केला.

 

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी

प्रवाशांसाठी खुशखबर ! शिवनेरीचा प्रवास आता झाला स्वस्त

ईव्हीएम ‘ हॅकिंग मुळे देश गिळंकृत :’ ईव्हीएम चे सत्य’ कार्यक्रमात आरोप