‘वंचित’च्या महाराष्ट्र ‘बंद’ला सोलापूरमध्ये ‘हिंसक’ वळण, बसच्या काचा फोडल्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज (शुक्रवार) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला महाराष्ट्रात संमीश्र प्रतिसाद मिळत असून सोलापूरमध्ये बंदला हिंसक वळण लागले आहे. सोलापूरमध्ये सिटी बसवर दगडफेक करण्यात आली. दगफेक केल्यानंतर दगडफेकर करणारे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या बंदला काँग्रेस, एमआयएम, माकपसह जिल्ह्यातील 150 संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात सकाळी अकराच्या सुमारास शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात आला. सकाळच्या सुमारास बंदला बहुतांश भागात प्रतिसाद मिळत आहे. शहरातील शाळा काही वेळासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या.

सोलापूर शरहात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच हिंसक वळणाने पोलीस सतर्क झाले आहेत. तोडफोड करण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलिसांची एक तुकडी दाखल झाली. पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्यांचा शोध सुरु आहे. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
वंचितलच्या बंदला महाराष्ट्रात कुठे कसा प्रतिसाद ?

बारामती – बारामती शहरामध्ये वंचितच्या बंदला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. शहरातील बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या आहेत.

मनमाड – बंदमध्ये शहरातील बाजार समिती सहभागी झाली आहे. त्यामुळे लिलाव बंद असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली.

वर्धा – शहरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शहरातील एसटी, पेट्रोल, शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरु आहेत.

अकोला – बंदला अल्प प्रतिसाद तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परिक्षा सुरु असल्याने शाळा महाविद्यालये सुरु आहेत.

शिर्डी – या ठिकाणी बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही. साईमंदिरात भक्तांची गर्दी असून शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like