राज्यात 280 ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा, प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने 280 ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीत झालेल्या शाईन बाग आंदोलनाच्या धर्तीवर देशभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत माहिती दिली. ग्रामपंचायत निवडणुकीत तीन हजार 769 उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहेत. तर 280 ग्रामपंचायतीवर वंचितने एक हाती सत्ता मिळवली आहे. ही सर्व माहिती आकडेवारी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा, तालुकास्तरावर घेतलेल्या अधिकृत माहितीवरून दिल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तसेच पुण्यातील पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मला व्हॉट्सऍप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजले. ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.