एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याविरुद्ध वंचितचे निवेदन

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रातील आग्रही असलेल्या भाजप सरकारच्या एनआरसी, सीएए, एनपीआर, कायद्याविरुद्ध विशेष अधिवेशन बोलावून ठरवा मंजूर करावा, असे आ. बाबाजानी दुर्राणी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाथरी येथे वंचित बहुजन आघाडी कडून दि. (22 फेब्रुवारी) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कायद्याविरुद्ध सभागृहात ठराव मंजूर करून केंद्राला पाठवण्यात यावा. देशातील केरळ, पंजाब, या राज्यात एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याविरुद्ध बहुमताने ठराव पारित करण्यात आले आहे. कायद्याविरुद्ध बहुमत पारित झाले नाही तर महाराष्ट्रातील 40 टक्के एससी, एसटी, ओबीसी मायनॉरिटी हे धोक्यात येतील असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अशोक पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली रा काँ जिल्हा अध्यक्ष आ. दुर्राणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.