‘वंचित’चे स्वतंत्र लढण्याचे संकेत, ‘जाहीरनामा’ प्रसिद्ध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. भाजपा-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीने राज्यात स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने आज आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मते घेतल्याने याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, आज प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून ‘एकला चलो रे’च्या मार्गाने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात जनतेला काही आश्वासनं दिली आहेत. राज्यात वंचितचे सरकार आल्यास पोलिसांची ड्युटी आठ तासांची करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केंद्र सरकारमध्ये असताना कामगार मंत्री होते. त्यांनी पोलिसांना केवळ आठ तासांची ड्युटी असली पाहिजे असे म्हटले होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेले काम अद्याप झाले नाही. सत्तेत आलेल्या एकानेही पोलिसांची ड्युटी आठ तासांची करण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –