Vande Mataram Sanghatana Pune | वंदे मातरम संघटनेच्या वतीने ‘शहीद बलिदान पुरस्कारां’चे वितरण

पुणे : Vande Mataram Sanghatana Pune | वंदे मातरम संघटनेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जणांना शहीद बलिदान पुरस्कार (Shahid Balidan Puraskar) देऊन सन्मानित करण्यात आले. (Vande Mataram Sanghatana Pune)

२३ मार्च १९३१ रोजी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. २३ मार्च १९८४ साली वंदे मातरम संघटनेची स्थापना काण्यात आली. शहिदांचा स्मृतिदिन व संघटनेचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात आपल्या कामगिरीने ठसा उमटविणारे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे संचालक गिरीश देसाई, सिंहगड महाविद्यालयाचे संचालक डॉ. वैभव दीक्षित, पुणे विद्यार्थी गृहचे कार्यध्यक्ष सुनील रेडकर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाचे विश्वस्त भाऊसाहेब जाधव यांना ‘ शहीद बलिदान पुरस्कार २०२३’ ने सन्मानित करण्यात आले. (Vande Mataram Sanghatana Pune)

संत तुकाराम महाराज पगडी, सन्मानपत्र, देशाच्या एकात्मतेचे प्रतीक तिरंगी पट्टी, शहीद भगतसिंह पुस्तक आणि तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराचे वितरण संघटनेचे प्रदेश कार्यध्यक्ष सचिन जामगे, प्रदेशअध्यक्ष वैभव वाघ, शहराध्यक्ष महेश बाटले, उपाध्यक्ष सुरज जाधव, महिला संपर्क प्रमुख शितल नलावडे, सीए शंकर जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष देवकर यांच्या हस्ते प्रत्येक कार्यालयात जाऊन करण्यात आले.

यावेळी बोलताना वंदे मातरम संघटनेचे प्रदेश कार्यध्यक्ष सचिन जामगे म्हणाले की, आपण समाजाचे देणे लागतो,
या भावनेतून पुरस्कार्थीनी अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक
सोईसुविधा मिळवून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींवर मात करून शिक्षणाचा मार्ग सुकर
केला आहे. भविष्यात देखील त्यांच्या हातून हे सत्कार्य घडत राहो.

शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना श्रद्धांजली वाहुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन संघटनेचे राज घाटे, ओंकार ताकतोडे, अजिंक्य शिंदे, नीलेश करवंदे, अश्रू खवळे,
आकाश जामगे, सुरज गायकवाड व इतर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते.

Web Title :-    Vande Mataram Sanghatana Pune | Distribution of ‘Martyrs’ Sacrifice Awards’ on behalf of Vande Mataram

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

H3N2 Virus | पुण्यात ‘एच3एच2’ मुळे प्रथमच दोघांचा मृत्यू, मृतांमध्ये जेष्ठ नागरिकासह महिलेचा समावेश

Adv. Gunaratna Sadavarte | अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ‘ती’ चूक भोवली, वकीलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द

Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून खुनाचा प्रयत्न करणार्‍याला 4 तासात अटक