#VideoViral : वाणी कपूरचा लुक पाहून चाहते घायाळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर नुकतीच अर्जुन कपूरच्या इंडियाज मोस्ट वॉन्टेड या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी स्पॉट करण्यात आलं. यावेळी वाणी कपूर पिवळ्या रंगाच्या लाँग ड्रेस मध्ये दिसून आली. वाणी खूपच सुंदर दिसत होती. याच लुक मधील वाणीचा एक फोटो आणि व्हिडीओ समोर आला आहे. एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bxz7LACHIBE/

वाणीचा व्हायरल होणारा हा फोटो आणि व्हिडीओ लोकांना फारच भावताना दिसत आहे. चाहत्यांना विशेष आवडताना दिसत आहे. वाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. अनेकांनी वाणीच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. काहींनी लुकबद्दल तिला कॉम्प्लिमेंट दिली आहे. तर काहींनी तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे. अनेकांना तिचा पेहराव आवडला आहे.

https://www.instagram.com/p/Bxz7Ry8HYVs/

वाणी कपूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. वाणी सेक्सी फोटो आणि व्हिडीओ सोशलवर नेहमीच व्हायरल होताना दिसत असतात. तिच्या चाहत्यांना तिच्या फोटोंची विशेष उत्सुकता असते. वाणीने याआधी तिचे बोल्ड अंदाजातील अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. ते व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून आले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा आगामी सिनेमा शमशेरा या सिनेमाच्या शुटींगच्या तयारीत ती व्यस्त आहे. या सिनेमात ती रणबीर कपूर सोबत दिसणार आहे. वाणी आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. याआधी वाणी रणवीर सिंग सोबत बेफिक्रे या सिनेमातून झळकली होती. तिला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली होती.