Vanita Kharat | महापरिनिर्वाणदिनी वनिता खरातने केली खास पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vanita Kharat | महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरात पोहोचली आहे. वनिताने अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. वनिताचे अनेक चाहतेही आहेत. आज ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. याच दिवसाचे औचित्य साधून वनिताने एक सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Vanita Kharat)

 

Advt.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शेअर करत वनिताने सुंदर असे कॅप्शनदेखील दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने “भीमा तू होतास म्हणून आम्ही आहोत,” असे म्हणत ही पोस्ट शेअर केली आहे. सध्या वनिताची ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Vanita Kharat)

सध्या वनिताने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरीदेखील कमेंट करत आहेत. ‘विनम्र अभिवादन’, ‘महामानवाला आदरांजली’, ‘जय भीम’ अशा अनेक कमेंट करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर महाराष्ट्राची हास्य जत्रेतील अनेक कलाकरांनीदेखील तिची पोस्ट शेअर करत महामानवाला अभिवादन केले आहे. मध्यंतरी वनिता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. तिने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह फोटो शेअर करत याचा खुलासा केला होता. यंदाच्या दिवाळीतही ते दोघे एकत्र दिसून आले होते.

 

Web Title :- Vanita Kharat | maharahstrachi hasyjatra star vanita kharat shared post on dr babasaheb ambedkar mahaparinirvan din

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार