Vanita Kharat | वनिता खरातच्या प्री-वेडिंग शूटने वेधले सगळ्यांचे लक्ष; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Vanita Kharat | प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात ही कधी न्यूड फोटोशूटमुळे तर कधी तिच्या चित्रपट आणि कार्यक्रमांमुळे नेहमी चर्चेत असते. सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे वनिता खरातला विशेष लोकप्रियता मिळाली. विनोदी अभिनयामुळे वनिता ही नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी वनिताने तिच्या लग्नाची तारीखही सांगितली होती. वनिता ही २ फेब्रुवारी 2023 रोजी प्रियकर सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. वनितानं नुकतेच तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. (Vanita Kharat)

Advt.

वनितानं शेअर केलेल्या प्री-वेडिंग फोटोमध्ये ती अबोली रंगाची साडी, पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज आणि ऑक्साइडची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. तर सुमित हा पांढरा शर्ट आणि काळी पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. यात वनिताने सुमितला लिप किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोमुळे सध्या ती चर्चेत आली आहे.या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, ‘गुपित मौनांचे नजरेस कळावे, ओठांचे मग चुंबन व्हावे’. या फोटोला दिलेल्या कॅप्शननेही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. वनिता आणि सुमित यांच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहेत. अनेकांनी या फोटोला लाइक केलं आहे. तर काहींनी या फोटोला कमेंट्स करुन वनिता आणि सुमित यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Vanita Kharat)

 

वनिताने काही महिन्यांपूर्वी सुमितच्या वाढदिवसानिमित्त जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली होती. त्या दोघांनी दिवाळीचा सणही एकत्र साजरा केला होता.
वनिताचा प्रियकर सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे.फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

 

Web Title :- Vanita Kharat | maharashtrachi hasyajatra fame vanita kharat share liplock photo with sumit londhe see caption

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shreyas Talpade | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी श्रेयस तळपदेने दिली ‘हि’ मोठी हिंट; पोस्ट वायरल

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

Gandhi Godse-Ek Yudh | ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी अभिनेत्री रेखाने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो वायरल