Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिने बॉयफ्रेंड कलाकार सुमित लोंढे सोबत लग्न केले आहे. या दोघांच्या प्री-वेडिंगच्या फोटो पासून ते लग्नापर्यंतच्या अनेक कार्यक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आता लग्नातील अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर होत आहेत. त्यातीलच अभिनेत्रीने घेतलेल्या एका झक्कास उखाण्याने मात्र सर्वांना थक्क केले आहे. सध्या वनिताच्या (Vanita Kharat) या उखाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर वनिताच्या लग्नाची तुफान चर्चा सुरू होती. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दिसत आहे की दोघांनी पारंपारिक वेशभूषा केली आहे. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर आता या दोघांच्या फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सुमित आणि वनिताच्या (Vanita Kharat) लग्न समारंभात महाराष्ट्राची हास्य जत्रेची संपूर्ण टीम उपस्थित होती.
यावेळी या टीमने उपस्थिती लावत फारच धमाल केल्याचे दिसत होते.
मेहंदी, हळदी, संगीत पासून ते रिसेप्शन पर्यंत सर्वच कार्यक्रमात या कलाकारांनी धमाल डान्स करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यातच आता वनितानी घेतलेल्या उखाण्याने मात्र चाहते फारच आनंदित झाल्याचे दिसत आहेत.
यावेळी वनिताने उखाणा घेत म्हटले की,
“टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा…सुमित तूच माझा महाराष्ट्र … तूच माझी हास्यजत्रा”.
सध्या वनिताचा हा उखाणा सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.
Web Title :- Vanita Kharat | maharashtrachi hasyajatra fame vanita kharat told marathi ukhana in wedding see viral video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update