Vanita Kharat | वनिता खरातने नवऱ्याला मिठी मारत शेअर केला ‘तो’ रोमँटिक फोटो

पोलीसनामा ऑनलाईन : Vanita Kharat | वनिता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली आहे. तिच्या विनोदबुद्धीचं प्रेक्षकही भरभरून कौतुक करत आहेत. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ सिनेमात तिनं साकारलेल्या भूमिकेमुळे आजही अनेकांच्या ती लक्षात आहे. काही महिन्यांपूर्वी वनिताने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचं निमित्त साधत इन्स्टाग्रामवर सुमित लोंढेबरोबरचा फोटो शेअर करत तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. 2 फेब्रुवारी 2023 रोजी वनिता तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्यासोबत लग्न करणार असून त्यापूर्वी त्यांनी प्रीवेडिंग शूटही केले आहे. वनिता आणि सुमित यांचा रोमँटिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला. (Vanita Kharat)
वनिताने नुकतेच प्री-वेडिंग शूट केलं आहे. इतकंच नव्हे तर यादरम्यान तिने काढलेले सुमितबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले. यात दोघेही ओलेचिंब असून ओठांना किस करत आहेत. हा फोटो पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. आता वनिता व सुमितचा नवा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. (Vanita Kharat)
या फोटोत वनिताने सुमितला मिठी मारली आहे. या फोटोमध्ये दोघंही फारच सुंदर दिसत आहेत.
फोटो इतकच फोटोला दिलेलं कॅप्शन हि सुंदर आहे.
ते कॅप्शन असं आहे की, “बोलक्या प्रश्नांनी साऱ्या कवेतच निरुत्तर व्हावे, गंध दरवळावा प्रेमाचा आपणही मग अत्तर व्हावे.” वनिताच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही कमेंट केली आहे.
तसेच तिच्या फोटोशूटचेही भरभरून कौतुक केलं आहे.
Web Title :- Vanita Kharat | vanita kharat pre wedding photoshoot share romantic photo with sumit londhe on instagram see pic
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?