Vanita Kharat | रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ‘ही’ अभिनेत्री झळकणार; ट्रेलर मध्ये दिसली झलक

पोलीसनामा ऑनलाइन टीम : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय शो मधील कलाकार आज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहेत. या शो मधील प्रत्येक कलाकार त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातो आणि कलाकारांना प्रसिद्धी देखील या शो मुळेच मिळाली आहे. या शोमधील अभिनेत्री वनिता खरातला (Vanita Kharat) देखील महाराष्ट्राची हास्य जत्रेमुळेच लोकप्रियता मिळाली आहे. आता वनिताच्या (Vanita Kharat) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

महाराष्ट्राची हास्य जत्रेत (Maharashtrachi Hasyajatra) वनिताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले. आज वनिताचे (Vanita Kharat) अनेक चाहते देखील आहेत.आजवर वनिता अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. नुकतीच ती ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली. एवढेच काय तर वनिता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) कबीर सिंग (Kabir Singh Movie) या चित्रपटातही झळकली होती. त्यानंतर आता वनिता बॉलीवूड (Bollywood) दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

 

रोहित शेट्टी (Rohit Shetty) मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ (School, College and Life) या चित्रपटातून तो मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. रोहितचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती त्याने स्वतः केली असून या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी शाळा महाविद्यालयीन जीवनामुळे व्यक्तीची होणारी जडणघडण आयुष्याला मिळणारे वळण हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलर मध्ये वनिताची एक झलक पाहायला मिळाली. या चित्रपटात वनिता सोबतच अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), तेजस्वी प्रकाश (Tejasvi Prakash), करण किशोर (Karan Kishore), प्रसाद जवादे (Prasad Javade) हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

Web Title :  Vanita Kharat | vanita kharat to play role in
bollywood director rohit shetty first marathi film school college and life

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Osho Sambodhi Divas | ओशो शिष्यांच्या एकजुटीपुढे ओशो आश्रम व्यवस्थापन नमले;
७० व्या ओशो संबोधी दिनानिमित्त हजारो शिष्यांकडून आश्रमाच्या बचावासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार

Dada Bhuse | संजय राऊतांवर बोलताना दादा भुसेंकडून शरद पवारांचा उल्लेख, विधानसभेत खडाजंगी; अजित पवार भडकले म्हणाले…

Kirron Kher | ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर यांना करोनाची लागण; स्वतः ट्विट करत दिली माहिती