पोलीसनामा ऑनलाइन : सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat Wedding) हिच्या विवाहाची चर्चा जोरात सुरू आहे. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्न गाठ बांधली आहे. काही दिवसांपासून त्यांच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्यातील फोटो देखील जोरात व्हायरल होताना दिसत होते. आता लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या लग्नातील (Vanita Kharat Wedding) महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या कलाकारांनी केलेले डान्स चे व्हिडिओ धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री वनिता खरात हिच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. आता तिच्या लग्नाचे काही खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. वनिताच्या आणि सुमितच्या लग्नात महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर या कलाकारांनी त्याच्या लग्नात खास डान्स देखील केला होता. या त्यांच्या डान्सने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. कलाकारांनी ‘बनो रे बनो मेरी चली ससुराल’, ‘नवराई माझी लाडाची’ आणि ‘मुड़ के ना देखो दिलबरो’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या डान्स नंतर वनिताच्या (Vanita Kharat Wedding) डोळ्यात अश्रू तरंगताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
वनिताने तिच्या लग्नात पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी त्यावर डिझायनर ब्लाऊज आणि पैठणी शेला असा मराठमोळा लुक करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यावेळी वनिता खूपच सुंदर दिसत होती.
तिने पारंपारिक दागिनेही परिधान केले होते. तर सुमितने शेरवानी आणि फेटा बांधत शाही लुक केला होता.
रात्री रिसेप्शनला या दोघांनी मॉर्डन लूक करत पुन्हा सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
यावेळी वनिताने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली तर सुमितने निळ्या रंगाचा सूट बूट घातला होता.
या दोघांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.
Web Title :- Vanita Kharat Wedding | vanita kharat sumit londhe wedding maharashtrachi hasyajatra actress dance bride cry see video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ravikant Shukla | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण
Ajit Pawar | ‘…आणि तिथेच खरी गफलत झाली’, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट