UP : अखिलेश यादव ‘बेपत्ता’, काँग्रेसकडून ‘पोस्टर’वॉर

आजमगड : वृत्तसंस्था – बिलरियागंजच्या घटनेवरून आता राजकारण तापू लागले आहे. समाजवादी पार्टीने पहिल्या दिवशी आंदोलनकर्त्यांविराधोतील कारवाईवरून सरकारला घेरले होते तर आता काँग्रेसने सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्याविरूद्ध पोस्टरवॉर सुरू केले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यक विभागाकडून शहरात हे पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये काँग्रेसने सवाल केला आहे की, सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलनादरम्यान मुस्लिम महिलांवर पोलिसांनी केलेल्या हिंसक कारवाईवर अखिलेश यादव गप्प का आहेत.

अखिलेश यादव 2019 च्या निवडणुकींनतर आजमगडमधून बेपत्ता आहेत, असे काँग्रेसच्या पोस्टरवर लिहिले आहे. पोस्टरवर अखिलेश यादव यांचा फोटो असून तोंडावर काळीपट्टी लावलेली आहे. काँग्रेसच्या या पोस्टरवॉरकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे, कारण सपा नेहमीच मुस्लिमांची हितचिंतक असल्याचा दावा करत आलेली आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर जेव्हा मुलायम सिंह निवडणूक जिंकल्यानंतर आजमगडला आले नाहीत तेव्हा भाजपाचे अल्पसंख्यांक सेलचे नेते सुफियान खान यांनी सगडी मतदारसंघात असेच पोस्टर लावले होते.