PM नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये 16 फेब्रुवारीला करणार 35 योजनांचे ‘लोकार्पण’-‘भूमीपुजन’, जाणून घ्या सर्व

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारीला रोजी वाराणसी दौऱ्यादरम्यान एकूण 12 हजार कोटींच्या 35 योजनांचे लोकार्पण करणार आहेत. दोन कोटींपेक्षा अधिक रकमेच्या या सर्व योजना आहेत. या योजनेमुळे वाराणसीचं नाही तर इतर आसपासच्या सात राज्यांना आणि नेपाळ मधील लोकांना देखील फायदा होणार आहे.

बीएचमध्ये नवनिर्मित 430 बेडचे सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटल, 74 बेडचे मनोरुग्ण हॉस्पिटल या क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे लोकांना आता आरोग्याच्या समस्येसाठी जास्त लांब जावे लागणार नाही तसेच खर्चही कमी करावा लागणार आहे.

11 रोगांसाठी मिळणार सुपर स्पेशिलिटी सुविधा
22 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी भूमिपूजन केलेल्या आरोग्य विषयक हॉस्पिटलचे उदघाटन आता पार पडणार आहे. यामधून जनतेला स्वस्तामध्ये उच्च प्रतीच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. या रुग्णालयात रेडिओलॉजी, न्यूरोसायन्स, न्यूरो सर्जरी, गॅस्ट्रो, किडनी, मधुमेह, बर्न संबंधित उपचार, प्लास्टिक सर्जरी आणि हृदय रोगातील सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस इत्यादीसारख्या मोठ्या आजारांवर उपचार घेता येणार आहेत. यामध्ये 430 बेड, 13 अत्याधुनिक ऑपरेशन थियेटर, ओपीडी इत्यादि सुविधा रुग्णांना मिळणार आहेत.

मनोचिकित्सा क्षेत्रासाठी ठरणार लाभदायक
विविध रूग्णांशी संबंधित रूग्णालयांची सुविधा जसे की पृथककरण कक्ष, इलेक्ट्रो कार्डिओग्राफी, इलेक्ट्रिकल ब्रेन राइटिंग, एमआरआय, स्ट्रेस लॅबोरेटरी, प्ले थेरपी, ऑब्झर्वेशन रूम, व्यावसायिक थेरपी, स्लीपिंग लॅबोरेटरी, लिथियम आणि औषध मूल्यांकन प्रयोगशाळा, मनोरुग्ण प्रयोगशाळा सेमिनार रूम, ग्रंथालय इ. ची तरतूद या रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे.

रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुमारे 20 महिन्यांत पूर्ण झाली आहे. हे पाच मजली असलेले हॉस्पिटल पूर्णपणे वातानुकूलित करण्यात आलेले आहे. याचे एकूण क्षेत्र 4050 वर्गमीटर इतके आहे.

22 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी बीएचयू अंतर्गत निवासी भावनांच्या निर्मितीचे भूमिपूजन केले होते. यामध्ये कँसर हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि कर्मचारी राहणार आहेत. याचे एकूण क्षेत्रफळ 19500 वर्गमीटर आहे. तसेच या ठिकाणी अग्निशमन सारख्या महत्वाच्या सुविधा देखील देण्यात आलेल्या आहेत.

वेदांचे रहस्य उलगडणार
बीएचयूमध्ये विज्ञान केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. याच्या निर्मितीसाठी तेरा महिन्यांचा कालावधी लागलेला होता. यात वैदिक साहित्यात रित्तिक आणि चित्त (चेतना शक्ती) विज्ञान विभाग, वैदिक भाषाशास्त्रातील ध्वनिकी आणि शब्द-व्युत्पत्ती विभाग, वैदिक चिकित्साशास्त्रातील मानसशास्त्र आणि योगशास्त्र विभाग, वैदिक गणितातील खगोलशास्त्र आणि पदार्थ विज्ञान विभाग, वैदिक कृषी, पर्यावरण विज्ञान आणि व्यवस्थापन विभाग, वैदिक आर्किटेक्चर आणि विज्ञान अभियांत्रिकी विभाग, अनुवाद आणि संपादन तेथे प्रकाशन विभाग असेल. अशा प्रकारे भारतातील प्राचीन वेद आणि संस्कृती यांचे जतन केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना देखील होणार मदत
यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या सुविधा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. यामध्ये अनेक महत्वाच्या सुविधांचा देखील समावेश आहे. या कामांतर्गत शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर्स 2604 बसविण्यात आले आहेत. 1415 सर्किट किलोमीटर नवीन लाईन तयार केली गेली आहे. या कामातून 447 गावांतील सुमारे 3894 शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. ज्यांना दिवसा व्यत्यय न देता शेतीच्या कामासाठी अखंड वीजपुरवठा केला जाईल.

उदघाटन होणाऱ्या इतर योजना

 1. 220 केव्ही राज तलावाची निर्मिती
 2. जिल्हा महिला केंद्राचे उदघाटन
 3. श्री शिवप्रसाद गुप्त मंडलीय आरोग्य विभागाचे आधुनिकरण
 4. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत मन्दाकिनी कुण्डचा जीर्णोद्धार
 5. डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड कंस्ट्रक्शन ऑफ कान्हा उपवन (गौशाळा)
 6. डोमरी ग्राम पिण्याच्या पाण्याची योजना
 7. श्री काशी विश्वनाथ मंदिरात भोजनालयाचे निर्माण
 8. पोलीस लाइन वाराणसीमध्ये 200 लोकांच्या क्षमतेच्या इमारतीची निर्मिती
 9. राजकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान कपसेठी, राज तलावाचीचे निर्माण
 10. चार लेन पुलाची निर्मिती
 11. क्षेत्रीय जनविश्लेषक प्रयोगशाळा निर्मितीचे कार्य
 12. विद्युत उपकेंद्र कंदवाची निर्मिती
 13. बुद्धा थीम पार्कमध्ये ऑडिटोरिअम आणि आधुनिकरण
 14. सारनाथ वरील रस्त्याचे रुंदीकरण
 15. बाबतपुर येथील ब्रिज मार्गाचे रुंदीकरण
 16. राजतलाव ते पोलीस चौकी पर्यटनाच्या रस्त्याचे रुंदीकरण
 17. लालपुर चट्टी पासून ते तक्खु पर्यतचा मार्ग
 18. जक्खिनी त्रिमहानी शहंशाहपुर बेलवांची निर्मिती
 19. छित्तुपुर टिकरी आयआयटी येथील महामार्ग
 20. भाऊपुर कालिकाधाम मार्गांचे कार्य
 21. मोहनसराय ते लहरतारा मार्ग
 22. जुना राष्ट्रीय मार्ग, रुंदीकरण, डिवायडर आणि रुंदीकरण
 23. रथयात्रा क्राॅसिंग ते भुल्लनपुर मार्ग आणि रुंदीकरण
 24. चौकाघाट लकडी येथील रस्त्याचे चौपदरीकरण
 25. मवईया तिराहा ते हवेलिया पटरिचे चौपदरीकरण
 26. किला कटरिया मार्ग नवीनीकरण
 27. जुना राष्ट्रीय मार्ग 7 चे सक्षमीकरण आणि नवनिर्माण
 28. रामबाग जीवनाथपुर मार्गाचे चौपदरीकरण
 29. शिवपुर लिंकचे चौपदरीकरण आणि नाल्याचे काम

यांचे होणार भूमिपूजन

 1. अलईपुर, वाराणसी उपकेंद्र
 2. वाराणसी शहरमध्ये आइपीडीएस फेज – 3 उपकेंद्र नगवाची निर्मिती
 3. पाच तलावांचा विकास आणि सौंदर्यकारण
 4. टाऊन हॉलमध्ये पार्क आणि पार्किंगचा पुनरविकास
 5. चार पार्क विकास आणि सौंदर्यकरण
 6. घाटांमध्ये साइन निर्मितीचे कार्य
 7. जुन्या काशीतील कालभैरव वार्डच्या पुनर्विकासाचे कार्य
 8. जुन्या काशीतील कामेश्वर महादेव वार्डचे पुनर्विकासाचे कार्य
 9. जुन्या काशीतील राज मंदिर वॉर्डाच्या पुनर्विकासाचे कार्य
 10. जनपद वाराणसी सिन्धोरा येथील पोलीस स्टेशनचे निर्माण
 11. जनपद वाराणसी येथे अग्निशमन भवनाच्या निर्मितीचे कार्य
 12. मंडी परिषद पहडिया, वाराणसीचे आधुनिकीकरण
 13. पंचक्रोशी येथे रस्ता निर्मिती
 14. झाम ते नरायनपुर रोडची निर्मिती
You might also like