Gold Mines in Sonbhadra : सोन पर्वतात दडलाय ‘अरबो-खरबों’चा ‘खजिना’, पण तिथं ‘खाण्या-पिण्या’चा नाही ‘ठिकाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्ह्यात एकीकडे सोन्याचा खच असल्याचे संशोधनातून उघड होत असताना दुसरीकडे या भागातील स्थानिक अदिवासींची परिस्थिती मात्र अत्यंत दयनीय आहे. पर्वतात राहणाऱ्या महिपत, दशरथ, धनीराम सर्वांची परिस्थिती एकसारखीच. येथे सोन्यापेक्षा जास्त चिंता आहे ती दोन वेळेच्या जेवणाची. पर्वतात सोनं असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांच्या मनात मात्र कोणतेही कुतूहल नाही.

या भागात सोनं असल्याचे ते त्यांच्या पूर्वजांपासून ऐकत आले आहेत. येथे सोने असल्याची माहिती सरकारने दिल्यानंतर ते आनंदी नाहीत तर उदास आहेत. त्यांनी चिंता आहे की सरकार त्यांना तेथून हटवणार तर नाही.

मुलभूत सुविधांची कमतरता –
स्वातंत्र्य मिळून सात दशकं पलटून गेली, परंतु रस्ते, वीज, पाण्यासाठी हे अदिवासी लोक त्रस्त आहेत. वाराणसी – शक्तिनगर महामार्गापासून सात किमी दूर पर्वतात स्थित चोपन तालुक्यातील पनारी ग्रामपंचायतीची लोकसंख्या 22,298 आहे. या गावात अद्यापही वीज येत नाही. सरकारी योजना येथे दिसत नाही. रेशनची दुकाने कागदावर आहेत. पावसाच्या ऋतूत येथे सर्पदंशाच्या अनेक घटना घडतात. येथे कुपोषणाने आणि सर्पदंशाने मृत होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

जीवनाचे साधन औषधी वनस्पती –
या लोकांच्या उपजिविकेचे साधन औषधी वनस्पती आहेत. तेंदू पत्ता, चिरंजी यांची विक्री करुन ते आपली उपजिविका भागवतात. पशुपालन करतात. याशिवाय या व्यतिरिक्त इतर हरडा-बहेडा वगैरे औषधे घेऊन देखील त्याची विक्री करतात.

इंग्रज काळात झाले होते खनन –
हा भाग दाट जंगलाने घेरलेला आहे. स्थानिक आदिवासींच्या मते इंग्रज अधिकारी सोनं मिळण्याच्या हेतूने येथे अनेकदा खनन करत. इंग्रजांनीच या पर्वताचे नाव सोना पर्वत ठेवले होते.

आदिवासींचे दु:ख –
पर्वतांवर राहणारे महिपत म्हणाले की आम्हाला कायम विस्थापित होण्याची भीती असते. जर येथे असे काही झाले तर आम्ही कुठे जाणार. तर दशरथ म्हणाले की खनन कार्य झाले तर आम्हाला देखील तेथे काम मिळाले पाहिजे. लल्लू म्हणाले की कदाचित यानंतर परिस्थिती बदलेल. हंसराज म्हणाले की रिहांद बाध होण्यापूर्वी आमच्या पूर्वजांनी बरीच स्वप्न दाखवण्यात आली होती. परंतु त्यांच्यासोबत काय झाले हे सर्वांना माहित पाहिजे. आता असे व्हायला नको.