‘इथं’ गुलालानं नव्हे तर चितेच्या राखेनं खेळली जाते ‘होळी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – होळीचे पर्व सर्वांसाठी खास असते आणि हा सण सर्वजण जोमात साजरा करतात. होळी रंगाने साजरी केली जाते. परंतु देशात असा एक दिवस आहे जेथे होळीच्या रंगानी नाही तर भस्माने खेळली जाते.

वाराणसीच्या काशीत भस्माने होळी खेळली जात आहे. असे सांगण्यात येते की चितेच्या राखेने लोक होळी खेळतात आणि अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. असे ही सांगण्यात येते की रंगभरी एकादशीच्या दिवशी महादेव भगवती गौराला निरोप देऊन आणि त्यांच्यासोबत होळी खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवभक्तांनी चितेच्या भस्माने होळी खेळली होती.

यानंतर ही परंपरा चालत आली. येथे महास्मशानवर दुपारी 12 वाजता स्मशानेश्वर महादेव मंदिरात आरतीनंतर जळत्या चितेतून काढण्यात आलेल्या गरम भस्माने होळी खेळतात. महास्मशानमध्ये होणाऱ्या होळीत दूर दूरुन लोक येतात आणि जोमात होळी खेळली जाते. यासह चितेतून काढलेली गरम राख काढून एकमेकांना लावली जाते आणि हवेत उडवली जाते. असे ही सांगितले जाते की या होळीत माणसंच नाही तर भूत पिशाच देखील होळी खेळतात.