आता राम मंदिराच्या भूमीपूजनावर वाद, शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी ठरलेला मुहूर्त ‘अशुभ’ असल्याचं सांगितलं

वाराणसी : वृत्तसंस्था – दशकांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत भूमीपूजन करतील. परंतु, भूमीपूजनाची तारीख आणि मुहूर्तावरून वाद निर्माण झाला आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी भूमीपूजनसाठी ठरलेली वेळ अशुभ असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, 5 ऑगस्टला दक्षिणायन भाद्रपद मास कृष्ण पक्षाची द्वितीय तिथी आहे. शास्त्रात भाद्रपद महिन्यात गृह, मंदिरारंभ कार्य निषिद्ध आहे. त्यांनी यासाठी विष्णु धर्मशास्त्र आणि नैवज्ञ वल्लभ ग्रंथाचा संदर्भ दिला. परंतु, काशी विद्वत परिषदेने शंकराचार्यांचे मत निराधार असल्याचे सांगत म्हटले की, ब्रह्मांड नायक रामाच्या स्वत:च्या मंदिरावर प्रश्न कसा उपस्थित केला जाऊ शकतो.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले की, आम्ही तर रामभक्त आहोत, राम मंदिर कुणीही बनवावे आम्हाला आनंदच आहे, परंतु त्यासाठी योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त असायला हवा. जर मंदिर जनतेच्या पैशातून तयार होत आहे तर त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.

तीन दिवस चालणार भूमीपूजन कार्यक्रम
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनी म्हटले की, श्रीराम मंदिराचा भूमीपूजन कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे. हा कार्यक्रम 3 ऑगस्टला सुरू होईल.

भूमीपूजनचा कार्यक्रम

3 ऑगस्टला पहिल्या दिवशी गणेश पूजन

4 ऑगस्टला रामर्चन

5 ऑगस्टला 12:15 वाजता पंतप्रधान राम मंदिराची पायाभरणी करतील. यावेळी काशी, प्रयागराज आणि अयोध्याचे वैदिक विद्वान आणि आचार्य पंडितांकडून रामललाच्या मंदिराचे भूमीपूजन करण्यात येईल.

9 नोव्हेंबरला अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ट्रस्ट गठीत करण्यात आला आणि ट्रस्टने राम मंदिर उभारण्यासाठी रामजन्म भूमीच्या परिसरात तयारीचा वेग वाढवला. याच दरम्यान 25 मार्चला रामलला यांना अस्थाई मंदिरात शिफ्ट करण्यात आले होते. यानंतर जमीनीचे सपाटीकरण पूर्ण करण्यात आले. देवाचे गर्भगृह 2.77 एकराच्या आतच राहील, ज्यामध्ये संपूर्ण वैदिक रिती-रिवाजासह काशीचे विद्वान आणि अयोध्याचे पुरोहित पंतप्रधानांकडून भूमीपूजन करून घेतील.