पेट्रोलियममंत्र्यांनी बाबा विश्वनाथ आणि काळभैरवाचे घेतले दर्शन, सांगितले – ‘कधी कमी होणार पेट्रोलचे दर ?’

पोलीसनामा ऑनलाईन : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी वाराणसीला काशीचे कोतवाल बाबा काल भैरव आणि बाबा विश्वनाथाच्या दरबारात हजेरी लावली. धर्मेंद्र प्रधान यांनी पूजनानंतर काल भैरव मंदिरात नजर देखील काढली. काळ भैरव मंदिरात दर्शन पूजनानंतर पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, देशात शांतता व सुख असावे, सर्वांचा विकास व्हावा, देशाचे व राज्याचेही कल्याण होईल यासाठी बाबांना प्रार्थना केली.

पेट्रोल दराबाबतच्या प्रश्नावर पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, आस्था ही वेगळी गोष्ट आहे आणि पेट्रोलच्या किंमती वाढणे वेगळे. ते म्हणाले की, 2 कारणांमुळे किंमती वाढत आहेत. हे फार काळ टिकणार नाही आणि लवकरच तोडगा निघेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादन वाढल्यास किंमती कमी होतील. कोरोनामुळे तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले. यामागील प्रमुख कारण म्हणजे गरज व मागणी कमी होती. 2021 च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मागणी नैसर्गिकरित्या वाढली आहे. ही गरज भागवण्यासाठी उत्पादन झाले नाही. किंमती वाढण्याचे हे मुख्य कारण आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलच्या दरात वाढ होण्याचे दुसरे कारण राज्य आणि केंद्र सरकारच्या खर्चात झालेली वाढ असल्याचे म्हंटले आहे.

प्रधान म्हणाले की, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. लोकांना रोजगार, आरोग्याची चिंता आणि विकासाला वेग आणि आर्थिक धोरण पुन्हा रुळावर आणावे लागेल. त्यामुळे शासनाचा खर्च वाढल्यास करांमुळे लोकांचे थोडे नुकसान झाले आहे. ते म्हणाले की, म्हणूनच राज्य आणि केंद्र सरकार या दोघांना मिळून मार्ग शोधावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

थंडीसह खाली येतील किंमती :
तसेच धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पेट्रोलचे दर थंडीसह खाली येतील. ते म्हणाले की, अमेरिकेतील बर्फाळ वादळामुळे पेट्रोलियमचे उत्पादन थांबले आहे. युरोपमधील ज्या देशांमध्ये एलपीजीचा वापर जास्त आहे तेथे मागणी वाढते. यामुळे नैसर्गिकरित्या किंमती वाढतात. सध्या एलपीजीच्या किंमती वाढविण्याचा ट्रेंड आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतींमध्ये वाढ होत आहे. अर्थमंत्र्यांनी म्हंटले होते की, पेट्रोलचे दर कमी करणे हे मोठे संकट आहे. कारण एकीकडे 35000 कोटींची लसीकरण योजना आहे, पाच लाख कोटी रुपयांच्या विकास योजना केंद्राच्या आहेत. राज्यांनाही देय आहे. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, हे सर्व एकीकडे आहेत आणि दुसरीकडे लोकांवर महागाई फटका बसू नये. अर्थमंत्र्यांना समतोल राखावा लागेल. राज्यांशी चर्चा करून कोणता ना कोणता मार्ग जरूर सापडेल.