इथं गल्ली-बोळात लागलय आगळं-वेगळं ‘पोस्टर’, ‘पोपट’ हरविल्याचा तपास करतायत ‘पोलिस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाळीव पोपटासाठी एक कुटूंब खूप बेचैन झाले आहे. पाळलेला पोपट हरवल्याने चक्क एका कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर कुटुंबीयांनी 5100 रुपये पोपटाला सापडून देणाऱ्याला बक्षिस देण्याचे घोषित केले आहे. शिवाय अनेक ठिकाणी पोपटाचे पोस्टर देखील लावले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ही घटना आहे.

बनारस की गल‍ियों में लग रहा अनोखा पोस्टर, तोते की खोज में जुटी पुल‍िस

वाराणसी येथील जैतपूरा क्षेत्रातील दारानगर परिसरात राहणारे अरविंद कुमार आणि त्यांचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून पाळीव पोपट हरवल्याने बेचैन झाले आहेत. तसेच त्यांनी आपल्या पोपटाला सापडून देणाऱ्याला 5100 रुपऱ्याचे बक्षिस ठेवले आहे. गेल्या शुक्रवारी घरात पाळलेला पोपट मिठू अचानक कोठेतरी उडून गेला. कुटुंबीयांनी सोशल मीडियावर मिठूचे फोटो टाकून कोणाला तो आढळल्यास आणून देण्याचे आवाहन केले आहे.

बनारस की गल‍ियों में लग रहा अनोखा पोस्टर, तोते की खोज में जुटी पुल‍िस

मिठूला शोधण्यासाठी ते दिवसातला बराच वेळ घालवत आहेत. म्हणूनच त्यांनी पोलिसांना देखील मिठूला शोधण्याचे आवाहन केले आहे.

बनारस की गल‍ियों में लग रहा अनोखा पोस्टर, तोते की खोज में जुटी पुल‍िस

मिठू हा त्यांच्या घरातील एक महत्वाचा सदस्य होता. विशेष म्हणजे हा पोपट पिंजऱ्यात न राहता घरातच मोकळे पणाने राहत होता. मिठुच्या हरवण्याने घरात एक दुःखी वातावरण तयार झालेले आहे.

बनारस की गल‍ियों में लग रहा अनोखा पोस्टर, तोते की खोज में जुटी पुल‍िस

Visit : Policenama.com