कौतुकास्पद ! ‘राफेल’ची पहिली महिला फायटर पायलट बनली वाराणसीची शिवांगी सिंह

वाराणसी : वृत्त संस्था – काशीची कन्या फ्लाईट लेफ्टनन्ट शिवांगी सिंहने आपले घर, जिल्हा आणि देशाचा मान वाढवला आहे. शिवांगी सिंह देशाचे सर्वात शक्तीशाली फायटर प्लेन राफेलच्या स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये एकमेव आणि पहिली महिला पायलट म्हणून सहभागी झाली आहे.

शिवांगी सिंहने एक महिन्याच्या टेक्निकल ट्रेनिंगमध्ये क्वालीफाय केल्यानंतर आता ती पहिल्या स्क्वाड्रनचा भाग आहे. तिच्या वडिलांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच शिवांगीसोबत चर्चा झाली होती, तेव्हा तिने माहिती दिली होती. मुलीच्या या कर्तुत्वावर आम्हाला अभिमान आहे. शिवांगी देशातील इतर मुलींसाठी सुद्धा आदर्श आहे, ज्यांना पंख लावून उडायचे आहे.

काशीच्या या कन्येने इतिहास रचण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये सुद्धा ती इंडियन एयरफोर्समध्ये फायटर प्लेन उडवणार्‍या पाच महिला पायलटमध्ये सहभागी झाली होती. आता तीन वर्षानंतर तिच्या नावावर आणखी एक यश नोंदले गेले आहे.

शिवांगी सिंहचे वडील कुमारेश्वर सिंह टूर अँड ट्रॅव्हलचे काम करतात. शहरातील फुलवरिया गावात राहणारी शिवांगी सिंहला लहानपणापासून आकाशात उडण्याची इच्छा होती. सीमा सिंह यांनी सांगितले की, लहानपणी ती खुप खट्याळ होती आणि तिला चिमण्यांप्रमाणे आकाशात उडायचे होते. शिवांगी हवाई दलाचे फायटर विमान मिग -21 बायसन उडवते. ती राफेलसाठी अंबालामध्ये तांत्रिक प्रशिक्षण घेत होती.