Varandha Ghat | पुणे-रायगडला जोडणारा वरंध घाट एप्रिल, मे महिन्यातच बंद, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना जारी, ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

रायगड : Varandha Ghat | पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने दरवर्षी पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट बंद ठेवण्यात येतो. यावर्षी मात्र, हा घाट ८ एप्रिलपासूनच दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. यासंदर्भातील सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे रायगड जिल्ह्यातील महाडला जाण्यासाठी वरंध घाट हा जवळचा मार्ग आहे. सध्या एप्रिल, मे महिन्यासाठी हा घाट बंद केल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत काम सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम केले जात आहेत.

या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ८ एप्रिल पासून ते ३० मे २०२४ पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे
व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी
राजेवाडी फाटा- पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर या मार्गाचा वापर करावा, असे सूचनेत म्हटले आहे.

पारमाची वाडी ते रायगड जिल्हा या ठिकाणी रस्त्याचे काम आता सुरु करण्यात येत आहे.
या रस्त्यात दरी व उंच डोंगर आहे. तसेच रस्त्याची रुंदी कमी आहे.
एसटी महामंडळाने आठ दिवसापासूनच वरंधा घाटातून जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित