का घातक बनतीये कोरोनाची दुसरी लाट? काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या (BHU) वैज्ञानिकांनी सांगितलं कारण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच देशभरात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. मात्र, कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत घातक बनत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेने सध्याची दुसरी लाट अत्यंत घातक बनत आहे. त्यावर वाराणसीच्या काशी हिंदू विद्यापीठाच्या (BHU) जंतू विज्ञानचे जीन वैज्ञानिकांनी त्याचे कारण शोधले आहे. वैज्ञानिकांनुसार, हार्ड इम्यूनिटी किंवा अँटिबॉडी लवकर संपणे हे यामागचे कारण असू शकते. अँटीबॉडी 6 महिन्यांपर्यंत प्रभावी राहील असे सांगितले जात होते. मात्र, ही 3 महिन्यात संपली. त्यामुळे कोरोनाविरोधात शरीरात हार्ड इम्युनिटी किंवा अँटिबॉडी विकसित झाल्याने दुसरी लाट घातक अशी सिद्ध झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्यामागचे कारण म्हणजे लोकांच्या शरीरातील अँटिबॉडी फक्त 3 महिन्यात संपणे आणि अनेकांनी कोरोना नियमावलींचे पालन केले नाही. याशिवाय आता जर तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरण गरजेचे आहे, अशी माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे.

लोकांमधील नष्ट झाली होती अँटीबॉडी

वाराणसीच्या या 100 लोकांचा पुन्हा अभ्यास केला. त्यांची अँटिबॉडी बनली होती. मात्र, नंतर त्यांची अँटिबॉडी तपासण्यात आली तेव्हा 93 लोकांची अँटीबॉडी नष्ट झाली होती. तसेच कोरोनाची भयानक परिस्थिती निर्माण झाली तेव्हा लॉकडाऊनही संपला होता.