Vardha : अर्वीचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

वर्धा : ऑनलाइन टीम –  राज्य पोलीस दलात उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी दिले जाणारे पोलीस महासंचालक सन्मान पदकांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लक्ष्मणाराव गायकवाड यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.

1 मे च्या पर्श्वभूमीवर दरवर्षी पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले जाते. यावर्षी 779 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यामध्ये आर्वी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला आहे.