‘त्या’ अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात अभिलाष मोहनपूरकर, श्याम मगरे दोषी

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन – १२ वर्षांच्या वर्धनचा अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांनीच गळा आवळून खून केल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात सिद्ध झाले. जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील कलमान्वये आरोपींना दोषी ठरविण्यात आले. या खटल्यात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

पाच कोटींच्या खंडणीसाठी टिळकनगरमधील वर्धन घोडे या १२ वर्षांच्या मुलाचा खून करण्यात आला आणि श्रेयनगरमधील नाल्यामध्ये त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी ही घटना घडली होती. पोलिसांना आरोपी अभिलाषजवळ पाच कोटी रुपयांची खंडणीची चिठ्ठी सापडली होती. तपासात पोलिसांना दोघा आरोपींविरोधात अनेक पुरावे सापडले. खटल्यात ७५० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. मागील सात महिन्यांपासून या प्रकरणावर ३० वेळा न्यायालयासमोर सुनावण्या झाल्या. ४१ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.
दीड ते पावणेदोन वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्यात अवघ्या सात महिन्यांत सुनावणी पूर्ण झाली. विशेष म्हणजे या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात नव्हे तर नियमित न्यायालयासमोर सुरू होती. खटल्यात सध्या शंभर पानी निकालपत्र असून शिक्षा सुनावल्यानंतर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. खटल्याच्या सुनावणीवेळी घोडे कुटुंब न्यायालयात हजर होते.

खून प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे म्हणणे चिठ्ठीद्वारे आरोपीने मांडण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या दिवशी मयत, श्याम मगरे आणि अभिलाष त्याच्या मैत्रिणीसह गेले. दरम्यान, पाच व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवत गाडी अडवली. सोबत असलेल्या मैत्रिणीवर अत्याचार केले. तसेच वर्धनलाही त्यांनीच मारल्याचे अभिलाषने दिलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. सदर मुलीशी लग्न करण्याची तयारीही अभिलाषने दाखवली. याविषयीची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.

…म्हणून इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला चोर